Skip to content

Haran

5 वचने · 7 कुटुंब सदस्य

Haran चा उल्लेख असलेली वचने

  1. तेरह 70 वर्षांचा होईपर्यंत त्याला अब्राम, नाहोर व हारान हे तीन पुत्र झाले.

  2. तेरहाच्या वंशजाचा तपशील: तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला.

  3. पण हारान त्याच्या पिता तेरह जिवंत असताना, आपल्या जन्मस्थानी, खाल्डियनांच्या ऊर गावी मरण पावला.

  4. अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता.

  5. मग आपला पुत्र अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा पुत्र लोट आणि आपली सून साराय, यांना बरोबर घेऊन कनान देशात जाण्यासाठी तेरहाने खाल्डियनांचे ऊर गाव सोडले; पण कनान देशात जाण्याऐवजी ते हारान शहरीच स्थायिक झाले.