Skip to content

Terah

10 वचने · 5 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Thara

Terah चा उल्लेख असलेली वचने

  1. नाहोर 29 वर्षांचा होता तेव्हा त्याला तेरह झाला.

  2. तेरहचा पिता झाल्यावर नाहोर पुढे आणखी 119 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  3. तेरह 70 वर्षांचा होईपर्यंत त्याला अब्राम, नाहोर व हारान हे तीन पुत्र झाले.

  4. तेरहाच्या वंशजाचा तपशील: तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला.

  5. पण हारान त्याच्या पिता तेरह जिवंत असताना, आपल्या जन्मस्थानी, खाल्डियनांच्या ऊर गावी मरण पावला.

  6. मग आपला पुत्र अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा पुत्र लोट आणि आपली सून साराय, यांना बरोबर घेऊन कनान देशात जाण्यासाठी तेरहाने खाल्डियनांचे ऊर गाव सोडले; पण कनान देशात जाण्याऐवजी ते हारान शहरीच स्थायिक झाले.

  7. तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन, हारान येथे तो मरण पावला.

  8. यहोशुआ सर्व लोकांना म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘फार पूर्वी तुमचे पूर्वज, अब्राहाम व नाहोराचा पिता तेरह, फरात नदीच्या पलीकडे राहत होते आणि ते इतर दैवतांची भक्ती करीत होते.

  9. सरूग, नाहोर, तेरह,

  10. तो याकोबाचा पुत्र, तो इसहाकाचा पुत्र, तो अब्राहामाचा पुत्र, तो तेरहाचा पुत्र, तो नाहोराचा पुत्र,