Creation Era
The Tower of Babel
Scattered nations and confused languages mark the beginning of the diversity of peoples across the earth.
या कालखंडातील वचने
नोआहचे पुत्र शेम, हाम व याफेथ यांची वंशावळ अशी: त्यांना जलप्रलयानंतर पुत्र झाले.
याफेथाचे पुत्र: गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास.
गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.
- उत्पत्ती १०:४सुमारे इ.स.पू. २३३८
यावानाचे पुत्र: एलिशाह, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.
- उत्पत्ती १०:५सुमारे इ.स.पू. २२४७
या वंशांचे लोक निरनिराळ्या देशांत समुद्र किनार्याजवळील वस्ती करणारी राष्ट्रे बनली. प्रत्येक भाषेनुसार, कुळानुसार ते राष्ट्रांमध्ये पसरले.
- उत्पत्ती १०:६सुमारे इ.स.पू. २२२८
हामाचे पुत्र: कूश, इजिप्त, पूट व कनान.
- उत्पत्ती १०:७सुमारे इ.स.पू. २२२८
कूशाचे पुत्र: सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका. रामाहचे पुत्र: शबा व ददान.
- उत्पत्ती १०:८सुमारे इ.स.पू. २२८९
कूशचा पुत्र निम्रोद होता, जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला.
- उत्पत्ती १०:९सुमारे इ.स.पू. २२८९
तो याहवेहसमोर एक बलवान शिकारी होता; “याहवेहसमोर निम्रोदासारखा पराक्रमी शिकारी.” असा उल्लेख करण्याची प्रथा पडली होती.
- उत्पत्ती १०:१०सुमारे इ.स.पू. २२५९
शिनार प्रांतातील बाबिलोन, एरक, अक्काद व कालनेह ही त्याच्या राज्यातील प्रमुख शहरे होती.
- उत्पत्ती १०:११सुमारे इ.स.पू. २३०४
शिनारपासून त्याने आपल्या राज्याचा विस्तार अश्शूरपर्यंत केला. त्याने निनवेह, रेहोबोथ ईर व कालह
- उत्पत्ती १०:१२सुमारे इ.स.पू. २३०४
व रेसन शहर, जे निनवेह व कालह यांच्या दरम्यान होते, ते वसविले. रेसन हे त्याच्या राज्यातील एक प्रमुख शहर होते.
- उत्पत्ती १०:१३सुमारे इ.स.पू. २३०४
इजिप्तचे पुत्र: लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,
- उत्पत्ती १०:१४सुमारे इ.स.पू. २३०४
पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यापासून पलिष्टी लोक आले) आणि कफतोरीम.
- उत्पत्ती १०:१५सुमारे इ.स.पू. २३०४
कनान यांचा पिता होता: प्रथमपुत्र सीदोन आणि हेथ,
- उत्पत्ती १०:१६सुमारे इ.स.पू. २३०४
यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
- उत्पत्ती १०:१७सुमारे इ.स.पू. २३०४
हिव्वी, आर्की, सीनी
- उत्पत्ती १०:१८सुमारे इ.स.पू. २३०४
अर्वादी, समारी व हमाथी. (नंतर कनानी वंशज विखुरले
- उत्पत्ती १०:१९सुमारे इ.स.पू. २३०४
आणि सीदोनापासून गरारपासून गाझाच्या पट्ट्यातील, सदोम, गमोरा, अदमाह व लेशाजवळील सबोईम येथवर कनानाची सीमा पसरली.)
- उत्पत्ती १०:२०सुमारे इ.स.पू. २३०४
वंश, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रांनुसार हे हामाचे गोत्र आहेत.
- उत्पत्ती १०:२१सुमारे इ.स.पू. २३०४
याफेथचा धाकटा भाऊ शेम यालाही पुत्र झाले, शेम एबरच्या सर्व संतानांचा पूर्वज होता.
- उत्पत्ती १०:२२सुमारे इ.स.पू. २३०४
शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.
- उत्पत्ती १०:२३सुमारे इ.स.पू. २३०४
अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.
- उत्पत्ती १०:२४सुमारे इ.स.पू. २३०४
अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला व शेलाह एबरचा पिता झाला.
- उत्पत्ती १०:२५सुमारे इ.स.पू. २२४७
एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.