Tongue बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
या वंशांचे लोक निरनिराळ्या देशांत समुद्र किनार्याजवळील वस्ती करणारी राष्ट्रे बनली. प्रत्येक भाषेनुसार, कुळानुसार ते राष्ट्रांमध्ये पसरले.
वंश, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रांनुसार हे हामाचे गोत्र आहेत.
त्याकाळी पृथ्वीवरील सर्व मानवांची एकच भाषा आणि एकच बोली होती.
पुढे ते पूर्वेकडे जात असता, त्या लोकांना शिनार प्रांतात एक मैदान लागले आणि त्यांनी तिथे वस्ती केली.
ते एकमेकास म्हणाले, “चला आपण विटा तयार करून त्याला पक्क्या भाजू या.” त्याप्रमाणे त्यांनी दगडाऐवजी विटा तयार केल्या आणि चुना म्हणून डांबर वापरले.
मग ते म्हणाले, “आपण स्वतःसाठी एक मोठे शहर आणि आकाशाला भिडणारा अतिउंच बुरूज बांधू म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ; नाहीतर पृथ्वीतलावर आपली पांगापांग होईल.”
परंतु जेव्हा मानव बांधत असलेले शहर आणि बुरूज पाहण्यास याहवेह खाली आले,
तेव्हा याहवेह म्हणाले, “हे सर्व एक असून त्यांची भाषा ही एकच आहे, जर ही योजना साध्य झाली तर मानवांना असाध्य असे काहीही राहणार नाही.
चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”
अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले.
म्हणून त्या शहराला बाबिलोन म्हणतात, कारण याहवेहने मानवांना गोंधळात पाडून अनेक भाषा दिल्या आणि सर्व पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली.
सुज्ञ अंतःकरणाचा मनुष्य आज्ञेचे पालन करतो, परंतु मूर्खपणाची बडबड करणार्या नाश होतो.
शब्द बहुगुणित करून पापाचा अंत होत नसतो; पण सुज्ञ लोक त्यांच्या जिभेवर ताबा ठेवतात.
ज्ञानी संयमाने शब्दाचा वापर करतो, आणि समंजस शांत स्वभावाचा असतो.
जे कोणी त्यांच्या तोंडावर आणि त्यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवतात, ते संकटापासून दूर राहतात.
बोलण्यास उतावळा अशा कोणाला तुम्ही पाहिले आहे काय? मूर्खाला त्यांच्यापेक्षा अधिक आशा आहे.
फाडण्याची वेळ व दुरुस्त करण्याची वेळ; मौन धरण्याची वेळ व बोलण्याची वेळ;
“यास्तव मी सर्व राष्ट्रांतील लोकांना आणि भाषिकांना एकत्र करेन, कारण त्यांनी कोणती योजना केली व कोणती कृत्ये केली आहेत, ते सर्व तिथे येतील व त्यांना माझे गौरव दिसेल.
जेव्हा पेंटेकॉस्टचा दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते.
एकाएकी स्वर्गातून प्रचंड सोसाट्याच्या वार्यासारखा आवाज आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले.
त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या.
तिथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले.
त्यावेळेस आकाशाखालील प्रत्येक देशामधून आलेले भक्तिमान यहूदी यरुशलेममध्ये राहत होते.
जेव्हा त्यांनी तो मोठा आवाज ऐकला, तेव्हा त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमली आणि ते गोंधळून गेले, कारण प्रत्येकाने स्वतःची मातृभाषा बोलली जात असलेली ऐकले.
विस्मित होऊन त्यांनी विचारले: “हे सर्व बोलत आहेत ते गालीलकर आहेत ना?