Shinar
हे नावानेही ओळखले जाते: Babylonish
32.5300, 44.4200 गूगल नकाशावर पाहा
Shinar चा उल्लेख असलेली वचने
शिनार प्रांतातील बाबिलोन, एरक, अक्काद व कालनेह ही त्याच्या राज्यातील प्रमुख शहरे होती.
पुढे ते पूर्वेकडे जात असता, त्या लोकांना शिनार प्रांतात एक मैदान लागले आणि त्यांनी तिथे वस्ती केली.
त्या काळात जेव्हा शिनारचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा केदोरलाओमेर व गोयीमाचा राजा तिदाल यांनी,
ते एलामाचा राजा केदोरलाओमेर, गोयीमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्याविरुद्ध लढले. ते पाच राजे विरुद्ध चार राजे असे लढले.
लुटीमध्ये मी एक सुंदर शिनारी झगा आणि दोनशे शेकेल चांदी, पन्नास शेकेल सोन्याची लगड या वस्तू पाहिल्या, तेव्हा त्या मला इतक्या हव्याशा वाटल्या की, मी त्या घेतल्या आणि त्या वस्तू माझ्या डेर्यात खाली जमिनीत पुरून ठेवलेल्या आहेत. झगा आणि सोने यांच्याहून चांदी सर्वात खाली पुरलेली आहे.”
त्या दिवशी प्रभू अश्शूरमधून, इजिप्तच्या खालील भागामधून, इजिप्तच्या वरील भागामधून, कूशमधून, पथरोसमधून, एलाममधून, शिनारमधून, हमाथमधून आणि भूमध्यसागराच्या बेटांमधून त्यांच्या अवशिष्ट लोकांवर पुन्हा हक्क सांगण्यासाठी दुसऱ्या वेळेस त्यांचा हात पुढे करतील.
आणि प्रभूने यहूदीयाच्या राजा यहोयाकीमला परमेश्वराच्या मंदिरातील काही पात्रांसोबत त्याच्या हाती दिले. ती शिनार प्रांतातील त्याच्या दैवताच्या मंदिरासाठी नेली आणि त्याच्या दैवताच्या खजिन्यात नेऊन ठेवली.
त्याने उत्तर दिले, “शिनार देशात, तिच्याकरिता घर बांधण्यासाठी. जेव्हा घर तयार होईल, तेव्हा ही टोपली त्यामध्ये तिच्या ठिकाणी ठेवण्यात येईल.”