Skip to content

Sodom बद्दल बायबलमधील वचने

91 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि सीदोनापासून गरारपासून गाझाच्या पट्ट्‍यातील, सदोम, गमोरा, अदमाह व लेशाजवळील सबोईम येथवर कनानाची सीमा पसरली.)

  2. तेव्हा लोटाने आपली नजर सभोवार फिरविली आणि यार्देन नदीकडील सोअरकडे पाहिले की भरपूर पाणी असलेले, याहवेहच्या बागेसारखे आणि इजिप्त देशासारखे ठिकाण होते. (ही घटना याहवेहने सदोम आणि गमोराचा नाश करण्याआधीची आहे.)

  3. अब्राम कनान देशात राहिला आणि लोटाने यार्देनेच्या पूर्वतीरावरील तळवटीतील शहरांमध्ये मुक्काम करीत सदोम शहरापाशी तळ दिला.

  4. सदोम शहरातील लोक दुष्ट होते आणि याहवेहच्या विरुद्ध महापातक करणारे होते.

  5. त्या काळात जेव्हा शिनारचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा केदोरलाओमेर व गोयीमाचा राजा तिदाल यांनी,

  6. सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाहचा राजा शिनाब, सबोईमाचा राजा शमेबर आणि बेलाचा म्हणजे सोअराचा राजा यांच्याशी युद्ध केले.

  7. दुसर्‍या गटाचे सर्व राजे सिद्दिमाच्या म्हणजे (मृत समुद्राच्या खोर्‍यात) एकत्र जमले.

  8. बारा वर्षापर्यंत ते केदोरलाओमेर या राजाची सेवा करणारी प्रजा होते, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले.

  9. चौदाव्या वर्षी, केदोरलाओमेर व त्याचे मित्रराजे यांनी अष्टरोथ-कर्णईम येथील रेफाईम लोकांचा व हाम येथील जूजीम लोकांच्या टोळीचा व शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा पराभव केला

  10. आणि होरी लोकांच्या टोळीला सेईर डोंगरात मार देऊन रानाच्या हद्दीवर असलेल्या एल-पारान येथपर्यंत पिटाळून लावले.

  11. पुढे ज्याला कादेश असे नाव मिळाले, त्या एन मिशपात (अर्थात् कादेश) आणि अमालेकी लोकांचा, संपूर्ण प्रदेश व हससोन-तामार येथे राहणार्‍या अमोरी यांचाही त्यांनी पराभव केला.

  12. पण आता सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाहचा राजा, सबोईमचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी सिद्दीमच्या खोर्‍यात हल्ला करण्याची तयारी केली.

  13. ते एलामाचा राजा केदोरलाओमेर, गोयीमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्याविरुद्ध लढले. ते पाच राजे विरुद्ध चार राजे असे लढले.

  14. सिद्दीमच्या खोर्‍यात डांबराच्या अनेक खाणी होत्या. सदोम आणि गमोरा येथील राजांच्या सैन्याने पळ काढला, तेव्हा काहीजण त्या खाणीत पडले, पण बाकीचे सैन्य डोंगरावर पळून गेले.

  15. चार राजांनी सदोम आणि गमोरा येथील मालमत्ता व अन्नसामुग्री लुटली आणि ते निघून गेले.

  16. सदोम येथे राहणारा अब्रामाचा पुतण्या लोट यालाही त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंसह ते घेऊन गेले.

  17. जेव्हा ते पुरुष पुढील प्रवासास जाण्यास उठले आणि त्यांनी खाली सदोमाच्या दिशेने पाहिले. अब्राहाम त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्याबरोबर थोडी वाट चालून गेला.

  18. मग याहवेह म्हणाले, “अब्राहामापासून मी माझा संकल्प गुप्त ठेवावा काय?

  19. कारण खात्रीने अब्राहाम एक महान व बलाढ्य राष्ट्र होईल आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.

  20. कारण मी त्याला निवडले आहे अशासाठी की त्याने त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना व त्याच्या घराण्याला याहवेहच्या मार्गात जे योग्य व न्यायी आहे, त्यात चालवावे, त्यामुळे अब्राहामाला दिलेले अभिवचन याहवेह पूर्ण करतील.”

  21. मग याहवेहने म्हटले, “सदोम आणि गमोरा विरुद्ध आक्रोश खूप वाढला आहे आणि त्यांचे पाप गंभीर आहे.

  22. मी खाली जाऊन बघेन, मग त्यांनी जे केले आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आक्रोशाएवढे वाईट आहे की नाही हे मला समजेल.”

  23. त्याच्याबरोबर असलेले पुरुष सदोमाच्या दिशेने गेले, पण अब्राहाम याहवेहपुढे उभा राहिला.

  24. अब्राहाम त्यांच्याजवळ गेला आणि विचारले: “तुम्ही दुष्टांबरोबर नीतिमानांचा सुद्धा नाश करणार काय?

  25. जर त्या शहरात पन्नास नीतिमान लोक आढळले तरी त्यांचा तुम्ही नाश करणार आणि त्यात असलेल्या नीतिमान लोकांसाठी तुम्ही त्यांची गय करणार नाही काय?