मुख्य मजकुरावर जा

Sodom बद्दल बायबलमधील वचने: King of, joins other kings of the nations resisting the invasion of Chedorlaomer

12 वचने · 8 पैलू

King of, joins other kings of the nations resisting the invasion of Chedorlaomer बद्दल वचने

  1. त्या काळात जेव्हा शिनारचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा केदोरलाओमेर व गोयीमाचा राजा तिदाल यांनी,

  2. सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाहचा राजा शिनाब, सबोईमाचा राजा शमेबर आणि बेलाचा म्हणजे सोअराचा राजा यांच्याशी युद्ध केले.

  3. दुसर्‍या गटाचे सर्व राजे सिद्दिमाच्या म्हणजे (मृत समुद्राच्या खोर्‍यात) एकत्र जमले.

  4. बारा वर्षापर्यंत ते केदोरलाओमेर या राजाची सेवा करणारी प्रजा होते, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले.

  5. चौदाव्या वर्षी, केदोरलाओमेर व त्याचे मित्रराजे यांनी अष्टरोथ-कर्णईम येथील रेफाईम लोकांचा व हाम येथील जूजीम लोकांच्या टोळीचा व शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा पराभव केला

  6. आणि होरी लोकांच्या टोळीला सेईर डोंगरात मार देऊन रानाच्या हद्दीवर असलेल्या एल-पारान येथपर्यंत पिटाळून लावले.

  7. पुढे ज्याला कादेश असे नाव मिळाले, त्या एन मिशपात (अर्थात् कादेश) आणि अमालेकी लोकांचा, संपूर्ण प्रदेश व हससोन-तामार येथे राहणार्‍या अमोरी यांचाही त्यांनी पराभव केला.

  8. पण आता सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाहचा राजा, सबोईमचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी सिद्दीमच्या खोर्‍यात हल्ला करण्याची तयारी केली.

  9. ते एलामाचा राजा केदोरलाओमेर, गोयीमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्याविरुद्ध लढले. ते पाच राजे विरुद्ध चार राजे असे लढले.

  10. सिद्दीमच्या खोर्‍यात डांबराच्या अनेक खाणी होत्या. सदोम आणि गमोरा येथील राजांच्या सैन्याने पळ काढला, तेव्हा काहीजण त्या खाणीत पडले, पण बाकीचे सैन्य डोंगरावर पळून गेले.

  11. चार राजांनी सदोम आणि गमोरा येथील मालमत्ता व अन्नसामुग्री लुटली आणि ते निघून गेले.

  12. सदोम येथे राहणारा अब्रामाचा पुतण्या लोट यालाही त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंसह ते घेऊन गेले.