मुख्य मजकुरावर जा

Sodom बद्दल बायबलमधील वचने: Figurative of wickedness

14 वचने · 8 पैलू

Figurative of wickedness बद्दल वचने

  1. इस्राएलातील कन्या वा पुत्रांनी मंदिरातील देवदासी बनू नये.

  2. त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेमधून येते, आणि गमोराच्या मळ्यातून येते. त्यांचे द्राक्ष विषाने भरलेले आहेत, आणि द्राक्षाचे घड कडू चवीचे आहेत.

  3. अहो, सदोमाचे राज्यकर्ते, याहवेहचे शब्द ऐका; तुम्ही गमोराचे लोकहो, आमच्या परमेश्वराची सूचना ऐका!

  4. शोमरोन तुझी थोरली बहीण होती, जी आपल्या मुलींसह तुझ्या उत्तरेस राहत होती; आणि तुझ्या दक्षिणेस राहणारी तुझी धाकटी बहीण सदोम आहे.

  5. तू त्यांच्या मार्गांचे केवळ अनुसरण करून त्यांची अमंगळ कृत्ये अंमलात आणली नाही, तर लवकरच तू त्यांच्याहीपेक्षा अति भ्रष्ट झालीस.

  6. सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, माझ्या जिवाची शपथ, तू व तुझ्या मुलींनी केलेली कृत्ये तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुलींनी केली नाहीत.

  7. “ ‘तुझी बहीण सदोम हिचे अपराध हे होते: ती व तिच्या मुली अहंकारी, खादाड व इतरांची काळजी न करणार्‍या अशा होत्या; त्यांनी गरीब व गरजवंतांना मदत केली नाही.

  8. त्या उन्मत्त असून माझ्यासमोर त्यांनी अमंगळ कृत्ये केली. म्हणून मी त्यांना माझ्यापासून दूर केले ते तर तू पाहिलेच आहे.

  9. शोमरोनने तर तुझ्या तुलनेत अर्धीसुद्धा पातके केली नाहीत. तू त्यांच्यापेक्षा अधिक अमंगळ कृत्ये केली आहेत आणि तू अशी कृत्ये करून तुझ्या बहिणींना नीतिमान असे दाखविले आहे.

  10. आपला कलंक वाहून घे, कारण तू तुझ्या बहिणींचे काही प्रमाणात समर्थन केले आहे. कारण तुझी पापे त्यांच्याहून अधिक घाणेरडी होती, तुझ्या बहिणी तुझ्यापेक्षा अधिक नीतिमान दिसतात. तर मग, लाज धर आणि आपला कलंक वाहून घे, कारण तू तुझ्या बहिणींना नीतिमान असे दाखविले आहे.

  11. “ ‘तथापि, सदोम व तिच्या मुलींची संपत्ती मी पुनर्स्थापित करेन आणि शोमरोन व तिच्या मुली व त्यांच्याबरोबर तुझीही संपत्ती पुनर्स्थापित करेन,

  12. यासाठी की त्यांचे सांत्वन करताना तू तुझा कलंक वाहून घेशील आणि तू केलेल्या कृत्यांची तुला लाज वाटेल.

  13. तुझ्या बहिणी सदोम व तिच्या मुली आणि शोमरोन व तिच्या मुली, त्यांच्या पूर्वस्थितीत परत जातील; आणि तू व तुझ्या मुली सुद्धा तुमच्या पूर्वस्थितीत परत जाल.

  14. तुझ्या गर्वाच्या दिवसात जेव्हा तुझी दुष्टता प्रगट झाली नव्हती, तेव्हा तू तर तुझी बहीण सदोमचे नाव देखील घेत नसे. त्याचप्रमाणे, आता, अरामाच्या कन्या व त्यांचे सर्व शेजारी आणि पलिष्ट्यांच्या कन्या यांनी तुझी अप्रतिष्ठा केली—तुझ्या सभोवती असलेल्या सर्वांनी तुला तुच्छ मानले.