Skip to content

Sodom बद्दल बायबलमधील वचने

91 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दूतांनी त्यांना ताकीद दिली, “आता जीव घेऊन पळा! पाठीमागे अजिबात वळून पाहू नका, सपाट भूमीवर रेंगाळत राहू नका! थेट डोंगरावर जा, नाहीतर तुम्हीही त्याच्या आवाक्यात याल!”

  2. यावर लोट विनवणी करीत म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून असे करू नका!

  3. तुम्ही तुमच्या सेवकाशी इतके दयाळूपणाने वागला आहात व तुम्ही माझा जीव वाचविला आहे. परंतु मला डोंगरावर पाठवू नका; तिथे कदाचित माझ्यावर काही अरिष्ट येईल आणि मी मरेन.

  4. पाहा, तिथे जवळच एक गाव आहे आणि ते लहानही आहे. तिथे पळून जाण्याची परवानगी द्या—हे अगदी लहानसे आहे, नाही का? म्हणजे माझा जीव वाचेल.”

  5. तो त्याला म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी विनंती मान्य करतो; तू म्हणतोस त्या गावाचा मी नाश करणार नाही.

  6. पण त्वरा कर आणि तिथे जा, कारण तू तिथे पोहोचेपर्यंत मला काहीच हालचाल करता येत नाही.” (त्या वेळेपासून त्या गावाचे नाव सोअर नगरी असे पडले.)

  7. सूर्योदयाच्या सुमारास लोट सोअर गावात जाऊन पोहोचला.

  8. मग याहवेहने सदोम आणि गमोरा या नगरांवर स्वर्गातून—याहवेहकडूनच—ज्वलंत गंधकाचा वर्षाव केला;

  9. आणि त्या दोन नगरांबरोबर आसपासची इतर गावे, तसेच सर्व वनस्पतीचा संपूर्ण नाश केला.

  10. परंतु लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिले, ती मिठाचा खांब झाली.

  11. दुसर्‍या दिवशी अब्राहाम पहाटेच उठला आणि ज्या ठिकाणी तो याहवेहसमोर उभा राहिला होता त्या ठिकाणी आला.

  12. त्याने मैदानापलीकडे असलेल्या सदोम आणि गमोरा याकडे नजर टाकली, भट्टीतून निघाल्यासारखे धुरांचे लोटच्या लोट त्या नगरातून उसळून वर येत आहेत, असे त्याला दिसले.

  13. मग जेव्हा परमेश्वराने त्या नगरांचा नाश केला, त्यांना अब्राहामाची आठवण आली आणि त्यांनी ज्या नगरास मृत्यूने विळखा घातला होता त्या लोट राहात असलेल्या नगरातून त्याला सोडविले.

  14. इस्राएलातील कन्या वा पुत्रांनी मंदिरातील देवदासी बनू नये.

  15. तुमचा संपूर्ण देश गंधक आणि क्षारयुक्त होऊन—पूर्णपणे जळून गेल्यामुळे ती एक निरुपयोगी भूमी झाली आहे असे त्यांना आढळून येईल आणि याहवेहने क्रोधाविष्ट होऊन त्याचा सदोम, गमोरा, अदमाह व सबोईम या देशांसारखाच नाश केला आहे हे त्यांना दिसेल.

  16. त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेमधून येते, आणि गमोराच्या मळ्यातून येते. त्यांचे द्राक्ष विषाने भरलेले आहेत, आणि द्राक्षाचे घड कडू चवीचे आहेत.

  17. अहो, सदोमाचे राज्यकर्ते, याहवेहचे शब्द ऐका; तुम्ही गमोराचे लोकहो, आमच्या परमेश्वराची सूचना ऐका!

  18. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्याच विरोधात साक्ष देतात; त्यांच्या पापांचे ते सदोम नगरीप्रमाणे प्रदर्शन करतात; ते लपवित नाहीत. त्यांचा धिक्कार असो! त्यांनीच स्वतःवर आपत्ती ओढवून घेतली आहे.

  19. खास्द्यांच्या राज्यांचे बहुमूल्य रत्न, बाबेलच्या लोकांचा अभिमान आणि गौरव, सदोम आणि गमोराप्रमाणे परमेश्वराकडून उद्ध्वस्त केल्या जाईल.

  20. आणि यरुशलेममधील संदेष्ट्यात मी काही भयानक गोष्टी बघितल्या: ते व्यभिचार करतात आणि लबाडीत जीवन जगतात. ते दुष्कर्म्याचे बाहू मजबूत करतात, जेणेकरून दुष्टतेपासून कोणीही परावृत्त होत नाही. ते सर्व मला सदोमातील लोकांसारखे वाटतात; यरुशलेम येथील लोक गमोरातील लोकांसारखे वाटतात.”

  21. याहवेह जाहीर करतात जसा सदोम व गमोराचा त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश झाला, म्हणजे तिथे कोणी राहणार नाही; त्यात लोक वस्ती करणार नाहीत.

  22. याहवेह जाहीर करतात, जसा मी परमेश्वराने सदोम व गमोराचा त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश केला, म्हणजे तिथे कोणी राहणार नाही. त्यात लोक वस्ती करणार नाहीत.

  23. माझ्या लोकांची शिक्षा सदोमापेक्षाही घोर झाली आहे, ज्यांना इतर कोणी मदत करण्याआधी त्यांचा एका क्षणात नायनाट झाला.

  24. शोमरोन तुझी थोरली बहीण होती, जी आपल्या मुलींसह तुझ्या उत्तरेस राहत होती; आणि तुझ्या दक्षिणेस राहणारी तुझी धाकटी बहीण सदोम आहे.

  25. तू त्यांच्या मार्गांचे केवळ अनुसरण करून त्यांची अमंगळ कृत्ये अंमलात आणली नाही, तर लवकरच तू त्यांच्याहीपेक्षा अति भ्रष्ट झालीस.