मुख्य मजकुरावर जा

Tongue बद्दल बायबलमधील वचने

56 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु कोणताही मनुष्यप्राणी जिभेला वश करू शकत नाही. ती चंचल दुष्ट, प्राणघातक विषाने पूर्णपणे भरलेली आहे.

  2. या जिभेने आपल्या प्रभू आणि पित्याची आपण स्तुती करतो, आणि याच जिभेने ज्याला परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे बनविले आहे अशा मनुष्यप्राण्याला शाप देतो.

  3. याप्रकारे स्तुती आणि शाप एकाच मुखातून निघतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असे असू नये.

  4. एकाच झर्‍यातून दोन्ही प्रकारचे ताजे पाणी आणि खारट पाणी वाहू शकते काय?

  5. माझ्या बंधूंनो व भगिनींनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे आणि द्राक्षवेल अंजीर उत्पन्न करू शकेल काय? नाही, तसेच खार्‍या पाण्याचा झरा ताजे पाणी देणार नाही.

  6. यानंतर मी पाहिले आणि सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यातील इतके लोक होते की त्यांचे मोजमाप करणे अशक्य होते. ते सर्व शुभ्र वस्त्रे घालून, हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन, राजासनासमोर आणि कोकरासमोर उभे होते.