मुख्य मजकुरावर जा

Creation Era

The Tower of Babel

Scattered nations and confused languages mark the beginning of the diversity of peoples across the earth.

64 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ११:१९सुमारे इ.स.पू. २००८

    रऊच्या जन्मानंतर पेलेग आणखी 209 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  2. उत्पत्ती ११:२०सुमारे इ.स.पू. २१८५

    रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता.

  3. उत्पत्ती ११:२१सुमारे इ.स.पू. १९७८

    सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  4. उत्पत्ती ११:२२सुमारे इ.स.पू. २१५५

    सरूगचा पुत्र नाहोर जन्मला तेव्हा तो 30 वर्षांचा होता.

  5. उत्पत्ती ११:२३सुमारे इ.स.पू. १९५५

    नाहोरच्या जन्मानंतर सरूग आणखी 200 वर्षे जगला, आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  6. उत्पत्ती ११:२४सुमारे इ.स.पू. २१२६

    नाहोर 29 वर्षांचा होता तेव्हा त्याला तेरह झाला.

  7. उत्पत्ती ११:२५सुमारे इ.स.पू. २००७

    तेरहचा पिता झाल्यावर नाहोर पुढे आणखी 119 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  8. उत्पत्ती ११:२६सुमारे इ.स.पू. २०५६

    तेरह 70 वर्षांचा होईपर्यंत त्याला अब्राम, नाहोर व हारान हे तीन पुत्र झाले.

  9. उत्पत्ती ११:२७सुमारे इ.स.पू. १९९६

    तेरहाच्या वंशजाचा तपशील: तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला.

  10. उत्पत्ती ११:२८सुमारे इ.स.पू. १९९६

    पण हारान त्याच्या पिता तेरह जिवंत असताना, आपल्या जन्मस्थानी, खाल्डियनांच्या ऊर गावी मरण पावला.

  11. उत्पत्ती ११:२९सुमारे इ.स.पू. १९९६

    अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता.

  12. उत्पत्ती ११:३०सुमारे इ.स.पू. १९९६

    सारायला मूलबाळ नव्हते कारण ती वांझ होती.

  13. उत्पत्ती ११:३१सुमारे इ.स.पू. १९२६

    मग आपला पुत्र अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा पुत्र लोट आणि आपली सून साराय, यांना बरोबर घेऊन कनान देशात जाण्यासाठी तेरहाने खाल्डियनांचे ऊर गाव सोडले; पण कनान देशात जाण्याऐवजी ते हारान शहरीच स्थायिक झाले.

  14. उत्पत्ती ११:३२सुमारे इ.स.पू. १९२१

    तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन, हारान येथे तो मरण पावला.