- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Creation Era
The Tower of Babel
Scattered nations and confused languages mark the beginning of the diversity of peoples across the earth.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती १०:२६सुमारे इ.स.पू. २२४७
योक्तानचे पुत्र: अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
- उत्पत्ती १०:२७सुमारे इ.स.पू. २२४७
हदोराम, ऊजाल, दिक्लाह,
- उत्पत्ती १०:२८सुमारे इ.स.पू. २२०७
ओबाल, अबीमाएल, शबा,
- उत्पत्ती १०:२९सुमारे इ.स.पू. २२०७
ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते.
- उत्पत्ती १०:३०सुमारे इ.स.पू. २२०७
(ते मेशापासून सफार या पूर्वेकडील डोंगरापर्यंतच्या भागात राहत होते.)
- उत्पत्ती १०:३१सुमारे इ.स.पू. २२०७
कुळे, भाषा, देश आणि राष्ट्रे अशाप्रकारे गोत्रानुसार विभागणी केलेले शेमचे हे वंशज होते.
- उत्पत्ती १०:३२सुमारे इ.स.पू. २२०७
वर दिलेल्या यादीत नमूद केलेले सर्व लोक नोआहच्या अनेक पिढ्यांतील गोत्र होते. त्यांनी निरनिराळ्या राष्ट्रांत वस्ती केली. ही सर्व राष्ट्रे जलप्रलयानंतर पसरली.
- उत्पत्ती ११:१सुमारे इ.स.पू. २२४७
त्याकाळी पृथ्वीवरील सर्व मानवांची एकच भाषा आणि एकच बोली होती.
- उत्पत्ती ११:२सुमारे इ.स.पू. २२४७
पुढे ते पूर्वेकडे जात असता, त्या लोकांना शिनार प्रांतात एक मैदान लागले आणि त्यांनी तिथे वस्ती केली.
- उत्पत्ती ११:३सुमारे इ.स.पू. २२४७
ते एकमेकास म्हणाले, “चला आपण विटा तयार करून त्याला पक्क्या भाजू या.” त्याप्रमाणे त्यांनी दगडाऐवजी विटा तयार केल्या आणि चुना म्हणून डांबर वापरले.
- उत्पत्ती ११:४सुमारे इ.स.पू. २२४७
मग ते म्हणाले, “आपण स्वतःसाठी एक मोठे शहर आणि आकाशाला भिडणारा अतिउंच बुरूज बांधू म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ; नाहीतर पृथ्वीतलावर आपली पांगापांग होईल.”
- उत्पत्ती ११:५सुमारे इ.स.पू. २२४७
परंतु जेव्हा मानव बांधत असलेले शहर आणि बुरूज पाहण्यास याहवेह खाली आले,
- उत्पत्ती ११:६सुमारे इ.स.पू. २२४७
तेव्हा याहवेह म्हणाले, “हे सर्व एक असून त्यांची भाषा ही एकच आहे, जर ही योजना साध्य झाली तर मानवांना असाध्य असे काहीही राहणार नाही.
- उत्पत्ती ११:७सुमारे इ.स.पू. २२४७
चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”
- उत्पत्ती ११:८सुमारे इ.स.पू. २२४७
अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले.
- उत्पत्ती ११:९सुमारे इ.स.पू. २२४७
म्हणून त्या शहराला बाबिलोन म्हणतात, कारण याहवेहने मानवांना गोंधळात पाडून अनेक भाषा दिल्या आणि सर्व पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली.
- उत्पत्ती ११:१०सुमारे इ.स.पू. २३४६
शेमाची वंशावळी: अर्पक्षद याचा जन्म जलप्रलयानंतर दोन वर्षांनी झाला, त्यावेळी शेम 100 वर्षांचा होता.
- उत्पत्ती ११:११सुमारे इ.स.पू. १८४६
अर्पक्षदाचा पिता झाल्यानंतर शेम आणखी 500 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
- उत्पत्ती ११:१२सुमारे इ.स.पू. २३११
अर्पक्षद 35 वर्षांचा असताना तो शेलाहचा पिता झाला.
- उत्पत्ती ११:१३सुमारे इ.स.पू. १९०८
शेलाहच्या जन्मानंतर अर्पक्षद आणखी 403 वर्षे जगला. त्या काळात त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
- उत्पत्ती ११:१४सुमारे इ.स.पू. २२८१
जेव्हा शेलाह 30 वर्षांचा झाला तेव्हा तो एबरचा पिता झाला.
- उत्पत्ती ११:१५सुमारे इ.स.पू. १८७८
आणि एबरचा पिता झाल्यावर शेलाह आणखी 403 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
- उत्पत्ती ११:१६सुमारे इ.स.पू. २२४७
एबरचा पुत्र पेलेग जन्मला तेव्हा एबर 34 वर्षांचा होता.
- उत्पत्ती ११:१७सुमारे इ.स.पू. १८१७
पेलेग जन्मल्यानंतर एबर 430 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
- उत्पत्ती ११:१८सुमारे इ.स.पू. २२१७
पेलेगचा पुत्र रऊ जन्मला तेव्हा पेलेग 30 वर्षांचा होता.