मुख्य मजकुरावर जा

Works बद्दल बायबलमधील वचने

257 वचने · 2 पैलू

"Works" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि जर आपण याहवेह आपल्या परमेश्वरासमोर दिलेल्या आज्ञेप्रमाणे या सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन केले, तर ते आपले नीतिमत्व असेल.”

  2. गहाणादाखल त्याने आपले पांघरूण दिले असेल व तर सूर्यास्तसमयी ते त्याला परत करावे म्हणजे ते पांघरूण अंगावर घेऊन तो झोपेल. तो तुमचे आभार मानेल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने तुमचे हे कृत्य नीतिमत्व असे ठरेल.

  3. हे माझ्या परमेश्वरा, मी जे काही या लोकांसाठी केले आहे, त्याबद्दल प्रसन्न होऊन माझी आठवण ठेवा.

  4. हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि परमेश्वराच्या भवनासाठी मी जे सर्व अत्यंत विश्वासूपणाने केले आहे ते पुसून टाकू नका.

  5. संकटात असलेल्यांसाठी मी रडलो नाही काय? गरिबांसाठी माझा जीव खिन्न झाला नाही काय?

  6. याहवेहवर भरवसा ठेव आणि चांगले ते कर; की तू सुरक्षित कुरणाचा आनंद उपभोगून देशात वसती करू शकशील.

  7. कोणत्याही व्यक्तीस इतर व्यक्तीचा उद्धार करण्यासाठी खंडणी भरता येत नाही; किंवा त्याच्या जिवाची खंडणी तो परमेश्वराला भरून देऊ शकत नाही.

  8. कारण मनुष्याच्या जिवाच्या खंडणीचे मोल फार मोठे आहे, कोणतेही पैसे कधीही पुरेसे होत नाहीत—

  9. आमच्या प्रभू परमेश्वराची कृपा आम्हावर होवो; आणि आमची सर्व कार्ये सुस्थिर होवोत— होय, आमच्या हाताच्या कार्यास सुस्थिरता येवो.

  10. तेव्हा फिनहास मध्यस्थ म्हणून उभा राहिला, आणि मग मरी थांबली.

  11. फिनहासाच्या या चांगल्या कृत्यामुळे त्याची पिढ्यान् पिढ्या सर्वकाळ नीतिमानात गणना होईल.

  12. प्रवाशांचे एक आराधना गीत. शलोमोनाची रचना. याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्‍यांचे जागणे व्यर्थ आहे.

  13. तुमचे पहाटे उठणे आणि रात्री उशीरापर्यंत अन्नप्राप्तीसाठी कष्ट करणे व्यर्थ आहे— कारण आपल्या प्रियजनांस याहवेहच शांत झोप देतात.

  14. सूर्याखाली होत असलेली प्रत्येक गोष्टी मी पाहिली आहे; त्या सर्व, वार्‍यामागे धावण्यासारखे व्यर्थ आहेत.

  15. भूतकाळाचे परीक्षण करा, चला, याबद्दल चर्चा करू या; तुम्ही निष्पाप आहा हे सिद्ध करण्यास आपली बाजू मांडा.

  16. मी तुझे नीतिमत्व आणि तुझी कर्मे उघडकीस आणेन, आणि ती तुला लाभदायक होणार नाही.

  17. आम्ही सर्वच अशुद्ध व्यक्तीसारखे झालो आहोत. आणि आमच्या नीतीची कृत्ये घाणेरड्या चिंध्या आहेत; आम्ही सर्व पानांप्रमाणे कोमेजतो, वाऱ्याने उडवून न्यावे, तशी आमची पापे आम्हाला दूर वाहून नेतात.

  18. “तू गंधसरूचा जास्तीत जास्त वापर केला तर ते तुला राजा बनविल काय? तुझा पिता खातपीत नव्हता काय? त्याने जे योग्य आणि न्याय्य केले, म्हणून त्याचे सर्व चांगलेच झाले.

  19. त्याने गोरगरीब, गरजवंताचे साह्य केले, म्हणून त्याचे सर्व भले झाले. मला जाणून घेणे म्हणजे हेच नाही काय?” असे याहवेह म्हणतात.

  20. “ ‘ते आपली चांदी रस्त्यावर फेकतील, आणि त्यांचे सोने अशुद्ध मानले जाईल. याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे चांदी व सोने त्यांची सुटका करू शकणार नाही. ते त्यांची भूक मिटवणार नाही किंवा त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांच्या संपत्तीनेच त्यांना पापात पडण्यास भाग पाडले आहे.

  21. जरी नोआह, दानीएल व इय्योब हे तिघे त्या देशात असते; तरी त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ तेच वाचले असते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  22. तर सार्वभौम याहवेह जाहीर करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी नोआह, दानीएल व इय्योब त्यात असते, ते आपल्या मुलांना किंवा मुलींना वाचवू शकले नसते. त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ ते आपलाच जीव वाचवू शकले असते.

  23. “समजा एक नीतिमान मनुष्य आहे जो न्याय्य व योग्य आहे तेच करतो जे.

  24. तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही. तो आपल्या शेजार्‍याच्या पत्नीला भ्रष्ट करीत नाही किंवा मासिक पाळीच्या वेळी स्त्रीबरोबर लैंगिक संबंध करीत नाही.

  25. तो कोणावर अत्याचार करीत नाही, तर उसने देताना घेतलेले गहाण परत करतो. जो लुटत नाही तर आपले अन्न भुकेल्यांस देतो आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो.