मुख्य मजकुरावर जा

Daniel

72 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Belteshazzar

"Daniel" साठी शोधा

Daniel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जरी नोआह, दानीएल व इय्योब हे तिघे त्या देशात असते; तरी त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ तेच वाचले असते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  2. तर सार्वभौम याहवेह जाहीर करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी नोआह, दानीएल व इय्योब त्यात असते, ते आपल्या मुलांना किंवा मुलींना वाचवू शकले नसते. त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ ते आपलाच जीव वाचवू शकले असते.

  3. तू दानीएलापेक्षा सुज्ञ आहेस काय? तुझ्यापासून काही गुपित नाही काय?

  4. जे निवडलेले होते, त्यामध्ये काही यहूदाह वंशातील होते: दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह.

  5. अश्पनज अधिकार्‍याने त्यांना नवीन नावे दिली: त्याने दानीएलला बेलटशास्सर; हनन्याहला शद्रख; मिशाएलला मेशख; आणि अजर्‍याहला अबेदनगो.

  6. पण दानीएलने राजाचे अन्न व द्राक्षारस घेऊन स्वतःला भ्रष्ट न करण्याचा निर्धार केला आणि त्याने मुख्य अधिकाऱ्याला अशा प्रकारे स्वतःला भ्रष्ट न करण्याची विनंती केली.

  7. आता परमेश्वराने दानीएलविषयी अधिकार्‍याची कृपा आणि दया प्राप्त होईल असे केले,

  8. परंतु अधिकारी दानीएलास म्हणाला, “मला माझे स्वामीराजाचे भय आहे, ज्यांनी मला तुमच्या खाण्या आणि पिण्याची देखरेख करण्यास नेमले आहे. तुमच्याबरोबरीच्या तरुणापेक्षा तुम्ही अशक्त का दिसावे? राजा तुमच्यामुळे माझे डोके उडवेल.”

  9. दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्या देखरेखीसाठी अधिकार्‍याने जो कारभारी नेमला होता, त्याला दानीएल म्हणाला,

  10. परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत.

  11. राजा त्यांच्यासोबत बोलला आणि त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्यासारखे कोणीही सापडले नाही; म्हणून त्यांना राजाच्या सेवेसाठी निवडण्यात आले.

  12. आणि कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत दानीएल राजाचा सल्लागार या पदावर होता.

  13. ज्ञानी लोकांना मारण्याचे फर्मान काढण्यात आले आणि दानीएल व त्याच्या मित्रांचा वध करण्यासाठी लोकांना पाठविण्यात आले.

  14. जेव्हा अर्योक हा राजाच्या संरक्षकांचा प्रमुख बाबेलमधील ज्ञानी पुरुषांचा वध करण्यासाठी गेला तेव्हा दानीएल शहाणपणाने व सुज्ञपणे त्याच्याशी बोलला.

  15. त्याने राजाच्या अधिकार्‍याला विचारले, “राजाने असा कठोर निर्णय का घेतला?” अर्योकने मग दानीएलला सर्व हकिकत सांगितली.

  16. ते ऐकून दानीएलने राजाची भेट घेतली व त्याला म्हणाला मला थोडा वेळ देण्याची मागणी केली, म्हणजे तो स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकेल.

  17. मग दानीएल आपल्या घरी परत आला व सर्व घटना त्याने आपल्या सोबत्यांना हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांना सांगितली.

  18. दानीएलाने त्यांना या रहस्याबद्दल स्वर्गाच्या परमेश्वराची दया मागण्याची विनंती केली, जेणेकरून बाबेलमधील इतर ज्ञानी माणसांसह त्याचा आणि त्याच्या मित्रांचा नाश होऊ नये.

  19. त्या रात्री याहवेहने दानीएलला दृष्टान्तात ते रहस्य प्रकट केले. तेव्हा दानीएलने स्वर्गाच्या परमेश्वराला धन्यवाद दिला.

  20. आणि दानीएल म्हणाला: “परमेश्वराचे नाव सदासर्वकाळ धन्यवादित असो; कारण ज्ञान आणि सामर्थ्य हे त्यांचेच आहे.

  21. बाबेलमधील ज्ञानी लोकांचा वध करण्याचे काम अर्योकवर सोपविले होते. दानीएल त्याला जाऊन भेटला व म्हणाला, “बाबेलमधील ज्ञानी लोकांचा वध करू नका. मला राजाकडे घेऊन चला आणि मी राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगेन.”

  22. अर्योकने लगबगीने दानीएलला राजाकडे घेऊन गेला आणि म्हणाला, “यहूदी कैद्यांपैकी मला एक पुरुष सापडला आहे जो राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकेल.”

  23. राजाने दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जाते) विचारले, “मी जे स्वप्न पाहिले ते आणि त्याचा अर्थ तू सांगण्यास सक्षम आहेस काय?”

  24. दानीएलने उत्तर दिले, “महाराजांनी ज्या रहस्याबद्दल विचारले, त्याबद्दल कोणीही ज्ञानी मनुष्य, ज्योतिषी, जादूगार किंवा दैवप्रश्न करणारे राजाला या गोष्टी सांगू शकणार नाही,

  25. मग नबुखद्नेस्सर राजाने दानीएलसमोर साष्टांग दंडवत घालत तो पालथा पडला आणि आज्ञा केली की त्याला अर्पणे व सुगंधी द्रव्ये सादर करावी.