मुख्य मजकुरावर जा

Daniel

72 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Belteshazzar

Daniel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “माझ्या राज्याच्या प्रत्येक भागातील लोकांनी दानीएलच्या परमेश्वराचे भय बाळगावे आणि आदर करावा.

  2. ते सुटका करतात व ते वाचवितात;

  3. याप्रमाणे दारयावेश राजाच्या आणि कोरेश पारसीच्या कारकिर्दीत दानीएल समृद्ध झाला.

  4. बाबेलचा राजा बेलशस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या बिछान्यावर पडला असताना त्याने स्वप्न पाहिले व मनात दृष्टान्त पाहिला. त्याने आपल्या स्वप्नाचा सारांश लिहून ठेवला.

  5. दानीएल म्हणाला: रात्री मी आपल्या दृष्टान्तात पाहिले, माझ्यापुढे स्वर्गातील चार वाऱ्यांनी मोठ्या समुद्राला घुसळले.

  6. “मी, दानीएल, माझ्या आत्म्यात खूप व्यथित झालो आणि मी माझ्या मनात जो दृष्टान्त पाहिला, त्यामुळे मी गोंधळून गेलो.

  7. “येथे हा विषय समाप्त होतो. मी दानीएल, आपल्या विचारांनी व्याकूळ झालो. आणि माझा चेहरा पांढराफटक पडला, परंतु मी ही गोष्ट आपल्या मनात ठेवली.”

  8. बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी, मी जो दानीएलने पहिल्यासारखाच आणखी एक दृष्टान्त पाहिला.

  9. मग मी दानीएल, या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा ते जाणून घेण्याच्या प्रयत्न करू लागलो, तेवढ्यात एकाएकी मानवासारखा दिसणारा कोणी एक पुरुष माझ्यासमोर उभा राहिला.

  10. मग मी दानीएल, बेशुद्ध झालो आणि पुढेही कित्येक दिवस आजारी होतो. पुढे मी उभा झालो आणि राजाचा कारभार पाहू लागलो. परंतु या दृष्टान्तामुळे मी विस्मित झालो, माझे अंतःकरण फार अस्वस्थ झाले; ते समजण्यापलीकडे होते.

  11. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मला, दानीएलला, संदेष्टा यिर्मयाहला दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार पवित्र शास्त्रातून समजले की यरुशलेम सत्तर वर्षे उजाड अशा अवस्थेत राहील.

  12. त्याने मला समज दिली आणि मला म्हटले, “दानीएला, आता मी तुला ज्ञान आणि समज देण्यासाठी आलो आहे.

  13. पर्शियाचा राजा कोरेश च्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असे म्हटले जाते) एक प्रकटीकरण झाले. तो संदेश खरा असून त्याचा संबंध मोठ्या युद्धाशी होता. संदेशाचा समज दृष्टान्ताद्वारे त्याच्याकडे आला.

  14. त्यावेळेस मी, दानीएल, तीन आठवडे शोक करीत होतो.

  15. हा दृष्टान्त केवळ मला, दानीएललाच दिसला; जे माझ्याबरोबर होते, त्यांना तो दिसला नाही, परंतु त्यांना अतिशय भीतीने ग्रासले व लपण्यासाठी ते पळून गेले.

  16. त्याने म्हटले, “हे दानीएला, परमप्रिय पुरुषा, मी जी काही वचने तुला सांगत आहे, ती लक्षपूर्वक ऐक आणि नीट उभा राहा, कारण मला तुझ्याकडे पाठविण्यात आले आहे.” आणि जेव्हा त्याने हे म्हटले, तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो.

  17. तो पुढे म्हणाला, “दानीएला, भिऊ नकोस. कारण ज्या पहिल्या दिवशी तू समजून घेण्यास आणि स्वतःला आपल्या परमेश्वरासमोर नम्र करण्यास मन लावलेस, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आहे आणि आणि मी त्यांना प्रतिसाद म्हणून आलो आहे.

  18. पण हे दानीएला, गुंडाळीतील ही वचने गुप्त ठेव आणि गुंडाळी शेवटच्या काळासाठी मोहोरबंद करून ठेव. पुष्कळजण इकडून तिकडे फिरतील आणि ज्ञान वाढत जाईल.”

  19. तेव्हा मी दानीएलाने पाहिले, नदीच्या या तीरावर एक आणि त्या तीरावर एक असे दोन पुरुष उभे असलेले मला दिसले.

  20. त्याने उत्तर दिले, “हे दानीएला, आता जा, कारण अखेरचा काळ येईपर्यंत या गोष्टींना गुंडाळून आणि शिक्का मारून बंद करण्यात आले आहे.

  21. “संदेष्टा दानीएलाने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ पवित्रस्थानी उभा असलेला तुम्ही पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे—

  22. “जेव्हा तुम्ही ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ ज्या ठिकाणी त्याचा संबंध नाही, त्या ठिकाणी उभा असलेला पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे—त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे.