Skip to content

Persecution बद्दल बायबलमधील वचने

270 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.”

  2. नंतर एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला, त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता.

  3. त्याने आपल्या लोकांना सांगितले, “पाहा, इस्राएली लोक संख्येने आपल्यापेक्षा जास्त आहेत.

  4. चला त्यांच्याशी चातुर्याने वागू या, नाहीतर त्यांची संख्या अजून वाढेल, आणि लढाई झाली तर ते आपल्या शत्रूंशी एक होतील आणि देश सोडून जातील.”

  5. म्हणून त्यांनी इस्राएली लोकांवर गुलाम मुकादम ठेवले व त्यांच्याकडून जुलमाने फारोहसाठी पीथोम व रामसेस ही भंडारांची नगरे बांधून घेतली.

  6. परंतु जेवढा त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तेवढे ते जास्त बहुगुणित झाले आणि पसरले; म्हणून इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांचे भय वाटू लागले.

  7. इजिप्तचे लोक इस्राएली लोकांकडून कठोरपणे कष्ट करून घेऊ लागले.

  8. विटा व चुन्यातील कष्टाच्या कामाने त्यांचे जीवन कठीण केले आणि शेतातील प्रत्येक प्रकारच्या कष्टाच्या कामात त्यांच्याशी इजिप्तचे लोक कठोरतेने वागले.

  9. आणि तो पुढे म्हणाला, “माझा धनी आपल्या सेवकाचा पाठलाग का करीत आहे? मी काय केले आहे आणि कोणत्या बाबतीत दोषी आहे?

  10. तेव्हा ईजबेलने एलीयाहकडे असे म्हणत एक दूत पाठवला, “उद्या या वेळेपर्यंत मी त्यांच्यातील एकाप्रमाणे तुझ्या जिवाचे केले नाही तर देव माझे त्याहूनही अधिक वाईट करो.”

  11. आणि त्यांना सांगा, ‘राजा असे म्हणतात: या मनुष्याला तुरुंगात टाका आणि मी सुखरुप परत येईपर्यंत त्याला केवळ भाकर आणि पाणी द्या.’ ”

  12. राष्ट्रे कट का रचत आहेत, आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत?

  13. याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत,

  14. “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.”

  15. स्वर्गातील सिंहासनावर जे विराजमान आहेत ते हसतात; प्रभू त्यांचा उपहास करतात.

  16. ते त्यांना क्रोधाने दटावतात आणि याहवेहच्या संतापाने त्यांचा थरकाप होतो, ते असे म्हणतात,

  17. बिन्यामीनी कूशच्या बोलण्यावरून याहवेहस गायलेले दावीदाचे शिग्गायोन. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमचा आश्रय घेतो; जे माझ्या पाठीस लागले आहेत, त्या सर्वांपासून माझे रक्षण करा आणि मला सोडवा.

  18. त्यांनी आपली घातक शस्त्रे सज्ज केली आहेत; आपले अग्निबाण तयार ठेवले आहेत.

  19. दुष्ट मनुष्य आपल्या उद्धटपणात दुर्बलांचा छळ करतो, त्याने योजलेल्या दुष्ट योजनांमध्ये असहाय अडकले जातात.

  20. माझे शत्रू म्हणतील “मी त्याला पराभूत केले आहे,” आणि माझ्या पतनाबद्दल ते आनंदित होतील.

  21. संगीत दिग्दर्शकासाठी. “पहाटेची हरिणी” या रागावर बसविलेले दावीदाचे स्तोत्र. माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का?

  22. माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही.

  23. परंतु मी तर कीटक आहे, मनुष्य नाही, मनुष्याकडून माझा तिरस्कार आणि अवहेलना झाली आहे.

  24. मला पाहून ते माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत,

  25. ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे, याहवेह त्याला मुक्त करो. तेच त्याची सुटका करो, कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे.”