Skip to content

Shadrach

18 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Hananiah

Shadrach चा उल्लेख असलेली वचने

  1. जे निवडलेले होते, त्यामध्ये काही यहूदाह वंशातील होते: दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह.

  2. अश्पनज अधिकार्‍याने त्यांना नवीन नावे दिली: त्याने दानीएलला बेलटशास्सर; हनन्याहला शद्रख; मिशाएलला मेशख; आणि अजर्‍याहला अबेदनगो.

  3. दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्या देखरेखीसाठी अधिकार्‍याने जो कारभारी नेमला होता, त्याला दानीएल म्हणाला,

  4. राजा त्यांच्यासोबत बोलला आणि त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्यासारखे कोणीही सापडले नाही; म्हणून त्यांना राजाच्या सेवेसाठी निवडण्यात आले.

  5. मग दानीएल आपल्या घरी परत आला व सर्व घटना त्याने आपल्या सोबत्यांना हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांना सांगितली.

  6. मग दानीएलच्या विनंतीवरून राजाने शद्रख, मेशख व अबेदनगो यांना बाबेल प्रांताचा प्रशासक सहायक म्हणून नेमले, परंतु की दानीएल राजाच्या दरबारातच राहिला.

  7. परंतु काही यहूदी आहेत ज्यांना तुम्ही बाबेलच्या कारभारावर नेमलेले आहे—शद्रख, मेशख, व अबेदनगो—जे तुमच्या आज्ञेकडे लक्ष्य देत नाही. महाराज, यांनी आपली आज्ञा मानली नाही. ते तुमच्या दैवतांची सेवा करीत नाही किंवा आपण उभारलेल्या सुवर्ण पुतळ्याला नमनही करीत नाही.”

  8. नबुखद्नेस्सर क्रोधाने संतप्त झाला व शद्रख, मेशख व अबेदनगो यांना हजर करावे असा त्याने हुकूम दिला. तेव्हा या लोकांना राजासमोर आणण्यात आले,

  9. नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “शद्रख, मेशख आणि अबेदनगो, तुम्ही माझ्या दैवतांची सेवा व मी स्थापन केलेल्या सुवर्ण पुतळ्याची उपासना करीत नाही, हे खरे आहे काय?

  10. शद्रख, मेशख व अबेदनगो यांनी त्याला उत्तर दिले, “नबुखद्नेस्सर महाराज, याबद्दल तुमच्यासमोर आमचा बचाव करण्याची आम्हाला गरज नाही.

  11. तेव्हा नबुखद्नेस्सर हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांच्यावर रागाने संतप्त झाला आणि त्याची त्यांच्याबद्दलीची भावना बदलली. नेहमीपेक्षा भट्टी सातपट तापवावी असा त्याने हुकूम सोडला,

  12. आणि शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांना बांधून भट्टीत फेकण्यासाठी त्याने आपल्या सैन्यातील बलदंड वीरांना बोलाविले.

  13. राजाची आज्ञा कडक होती आणि भट्टी अतिशय तापली होती यामुळे ज्या सैनिकांनी शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांना भट्टीत टाकण्यासाठी उचलले होते, त्यांनाच अग्नीच्या ज्वालांनी ठार केले,

  14. आणि हे तीन पुरुष शद्रख, मेशख व अबेदनगो घट्ट बांधलेले असे धगधगत्या भट्टीत फेकण्यात आले.

  15. नबुखद्नेस्सर त्या धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ गेला आणि मोठ्याने हाक मारून म्हणाला, “परमोच्च परमेश्वराचे सेवक शद्रख, मेशख आणि अबेदनगो, बाहेर या! इकडे या!” तेव्हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो अग्नीतून बाहेर आले,

  16. तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेदनगोचे परमेश्वर धन्यवादित असो. ज्यांनी राजाची आज्ञा मोडून आपल्या परमेश्वराशिवाय अन्य दैवतांची सेवा किंवा उपासना करावयाची नाही असे ठरवून मरण पत्करले, तेव्हा त्याने आपला दिव्यदूत पाठवून आपल्या विश्वासू सेवकांची सुटका केली.

  17. म्हणून मी असे फर्मान काढतो की शद्रख, मेशख आणि अबेदनगोच्या परमेश्वराविरुद्ध कोणतेही राष्ट्र किंवा भाषा बोलणारे काहीही बोलतील तर त्यांचे तुकडे तुकडे करावेत आणि त्यांच्या घरादाराचेही उकिरडे करण्यात यावे. कारण परमेश्वर जसे सोडवितात, तसे दुसर्‍या कोणत्याही दैवताला करता येणार नाही.”

  18. नंतर राजाने शद्रख, मेशख व अबेदनगो यांना बाबेल प्रांतात बढती दिली.