Persecution बद्दल बायबलमधील वचने: Mistaken zeal
Mistaken zeal बद्दल वचने
परंतु यहूदी पुढार्यांनी शहरातील उच्च वर्गातील धार्मिक स्त्रियांना व प्रमुख व्यक्तींना चिथविले. त्यांनी पौल व बर्णबा यांचा छळ करून त्यांना त्यांच्या प्रांतातून हाकलून दिले.
“मला वाटत होते की नासरेथकर येशूंच्या नावाविरुद्ध जितके काही शक्य होईल तितके करावे.
आणि त्याप्रकारे मी यरुशलेममध्ये केले होते. तिथे प्रभूच्या अनेक लोकांना महायाजकाच्या अधिकाराने तुरुंगात डांबले आणि त्यांचा वध करण्याकरिता मी संमती देत असे.
अनेकदा मी एका सभागृहातून दुसर्या सभागृहात जात असे व त्यांना शिक्षा करून, बळजबरीने ईश्वरनिंदा करावयास भाग पाडीत असे. त्यांचा छळ करण्यास मी इतका झपाटलेला होतो की परकीय शहरात देखील मी त्यांचा पाठलाग करीत असे.