मुख्य मजकुरावर जा

Persecution बद्दल बायबलमधील वचने: Of Jesus

152 वचने · 61 पैलू

Of Jesus बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.”

  2. राष्ट्रे कट का रचत आहेत, आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत?

  3. याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत,

  4. “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.”

  5. स्वर्गातील सिंहासनावर जे विराजमान आहेत ते हसतात; प्रभू त्यांचा उपहास करतात.

  6. ते त्यांना क्रोधाने दटावतात आणि याहवेहच्या संतापाने त्यांचा थरकाप होतो, ते असे म्हणतात,

  7. संगीत दिग्दर्शकासाठी. “पहाटेची हरिणी” या रागावर बसविलेले दावीदाचे स्तोत्र. माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का?

  8. माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही.

  9. परंतु मी तर कीटक आहे, मनुष्य नाही, मनुष्याकडून माझा तिरस्कार आणि अवहेलना झाली आहे.

  10. मला पाहून ते माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत,

  11. ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे, याहवेह त्याला मुक्त करो. तेच त्याची सुटका करो, कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे.”

  12. माझ्यापासून दूर राहू नका, कारण संकट जवळ आहे आणि मला साहाय्य करणारा कोणी नाही.

  13. अनेक बैलांनी मला घेरले; बाशानातील दांडग्या बैलांनी मला घेरलेले आहे.

  14. गर्जना करीत आपल्या भक्ष्यांवर तुटून पडणार्‍या सिंहाप्रमाणे उघड्या जबड्यांनी ते माझ्यावर चालून येत आहेत.

  15. माझी शक्ती पाण्याप्रमाणे निथळून गेली आहे, माझी सर्व हाडे सांध्यातून निखळली आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्याआत वितळून गेले आहे.

  16. माझे मुख खापरीप्रमाणे शुष्क झाले आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तुम्ही मला मृत्यूच्या धुळीत मिळविले आहे.

  17. मला कुत्र्यांनी वेढले आहे, दुष्कर्म्यांची टोळी मला घेरून आहे; त्यांनी माझ्या हातापायाला विंधले आहे.

  18. माझ्या शरीरातील हाडे मी मोजू शकतो, हे लोक माझ्याकडे कसे टक लावून पाहत आहेत.

  19. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकतात.

  20. परंतु याहवेह, तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरेने या.

  21. तलवारीपासून मला सोडवा, कुत्र्यांच्या आक्रमणापासून माझे मोलवान प्राण वाचवा.

  22. सिंहाच्या जबड्यातून; रानटी बैलांच्या शिंगापासून माझे रक्षण करा.

  23. संगीत दिग्दर्शकासाठी. “कुमुदिनी” चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. परमेश्वरा, मला वाचवा; कारण पाणी गळ्यापर्यंत पोहोचले आहे.

  24. दलदलीत मी खोल रुतत चाललो आहे; मला माझ्या पायावर उभे राहता येत नाही. मी खोल दलदलीत आलो आहे; माझ्या सभोवती पाणी वाढत चालले आहे.

  25. अगदी थकून जाईपर्यंत मी मदतीसाठी आक्रोश केला आहे; माझा घसा कोरडा झाला आहे. आपल्या परमेश्वराची वाट पाहत, माझे डोळे थकले आहेत.