- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Persecution बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
माझ्यापासून दूर राहू नका, कारण संकट जवळ आहे आणि मला साहाय्य करणारा कोणी नाही.
अनेक बैलांनी मला घेरले; बाशानातील दांडग्या बैलांनी मला घेरलेले आहे.
गर्जना करीत आपल्या भक्ष्यांवर तुटून पडणार्या सिंहाप्रमाणे उघड्या जबड्यांनी ते माझ्यावर चालून येत आहेत.
माझी शक्ती पाण्याप्रमाणे निथळून गेली आहे, माझी सर्व हाडे सांध्यातून निखळली आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्याआत वितळून गेले आहे.
माझे मुख खापरीप्रमाणे शुष्क झाले आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तुम्ही मला मृत्यूच्या धुळीत मिळविले आहे.
मला कुत्र्यांनी वेढले आहे, दुष्कर्म्यांची टोळी मला घेरून आहे; त्यांनी माझ्या हातापायाला विंधले आहे.
माझ्या शरीरातील हाडे मी मोजू शकतो, हे लोक माझ्याकडे कसे टक लावून पाहत आहेत.
ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकतात.
परंतु याहवेह, तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरेने या.
तलवारीपासून मला सोडवा, कुत्र्यांच्या आक्रमणापासून माझे मोलवान प्राण वाचवा.
सिंहाच्या जबड्यातून; रानटी बैलांच्या शिंगापासून माझे रक्षण करा.
संगीत दिग्दर्शकासाठी. “कुमुदिनी” चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. परमेश्वरा, मला वाचवा; कारण पाणी गळ्यापर्यंत पोहोचले आहे.
दलदलीत मी खोल रुतत चाललो आहे; मला माझ्या पायावर उभे राहता येत नाही. मी खोल दलदलीत आलो आहे; माझ्या सभोवती पाणी वाढत चालले आहे.
अगदी थकून जाईपर्यंत मी मदतीसाठी आक्रोश केला आहे; माझा घसा कोरडा झाला आहे. आपल्या परमेश्वराची वाट पाहत, माझे डोळे थकले आहेत.
माझा विनाकारण द्वेष करणार्यांची संख्या माझ्या डोक्यावरील केसांपेक्षा अधिक आहेत; पुष्कळ लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत. मला नष्ट करण्याची त्यांची इच्छा आहे. मी जे चोरले नाही, त्याची भरपाई करण्याची माझ्यावर बळजबरी होत आहे.
हे परमेश्वरा, माझा मूर्खपणा तुम्हाला माहीत आहे; माझे दोष तुमच्यापासून लपलेले नाहीत.
हे प्रभू, सर्वशक्तिमान याहवेह, जे तुमच्यावर आशा ठेवतात, माझ्यामुळे ते लज्जित होऊ नये; इस्राएलाच्या परमेश्वरा, जे तुमचा शोध घेतात त्यांची माझ्यामुळे अप्रतिष्ठा होऊ देऊ नका.
तुमच्याकरिता माझी विटंबना झाली आहे, माझे मुख लज्जेने व्याप्त झाले आहे.
माझ्या कुटुंबासाठी मी परका आहे, माझी सख्खी भावंडेही मला ओळखत नाही.
तुमच्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, आणि त्यांनी केलेला तुमचा अपमान माझ्यावर पडला आहे.
जेव्हा मी शोक करून उपास केला, तेच माझ्यासाठी निंदेचे कारण ठरले;
जेव्हा मी गोणपाट पांघरले, तेव्हा ते माझ्याबद्दल उपहासाने बोलू लागले.
मी गावातील लोकांच्या कुत्सित चर्चेचा विषय झालो आहे आणि मी मद्यप्यांच्या गीतांचा विषय झालो आहे.
तरी याहवेह, तुमच्या प्रसन्नतेच्या वेळेसाठी मी तुमच्याकडे प्रार्थना करीत आहे; हे परमेश्वरा तुमच्या महान प्रीती निमित्त तुमच्या विश्वसनीय तारणाद्वारे मला उत्तर द्या.
मला या दलदलीतून बाहेर काढा; मला त्यामध्ये बुडू देऊ नका; माझा द्वेष करणार्यापासून मला वाचवा. खोल पाण्यातून मला बाहेर काढा.