मुख्य मजकुरावर जा

Persecution बद्दल बायबलमधील वचने

270 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बंधू व भगिनींनो, मी जर अजूनही सुंतेचा प्रचार करतो तर माझा छळ अजूनही का होतो? तर मग क्रूसाच्या अडथळ्याचे निर्मूलन झाले असते.

  2. जे दैहिकरितीने लोकांवर छाप पाडावयास पाहतात ते तुम्ही सुंता करून घ्यावी यासाठी दबाव टाकतात. ते एकाच कारणामुळे की ख्रिस्ताच्या क्रूसामुळे होणारा छळ त्यांना टाळता यावा.

  3. आणि आवेशाविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी दोषरहित होतो.

  4. त्यांनी प्रभू येशूंना आणि संदेष्ट्यांना ठार मारले; आणि आम्हालाही हाकलून लावले. त्यांनी परमेश्वराला नाखुश केले आणि सर्वांचे विरोधी झाले,

  5. परमेश्वर न्यायी आहेत: जे तुम्हाला त्रास देतात त्यांची परतफेड ते त्रासांनी करतील.

  6. दुष्ट व वाईट माणसांकडून आमची सुटका व्हावी म्हणूनही प्रार्थना करा, कारण प्रत्येकजण प्रभूवर विश्वास करणारा असतोच असे नाही.

  7. मी पूर्वी परमेश्वराची निंदा करणारा, छळ करणारा आणि जुलमी होतो, तरी देखील मजवर दया झाली, यासाठी की जे काही मी करीत होतो ते अज्ञानामुळे आणि अविश्वासामुळे केले.

  8. आणि अंत्युखिया, इकुन्या व लुस्त्र या शहरात आलेली संकटे आणि माझा झालेला छळ हे तुला पूर्ण माहीत आहे. परंतु या सर्वांतून प्रभूनेच मला सोडविले.

  9. खरे पाहिले तर ख्रिस्त येशूंमध्ये जे सुभक्तीने जीवन जगण्याचा निश्चय करतात, त्या सर्वांचा छळ होईल.

  10. कित्येकदा सार्वजनिक रीतीने तुमचा अपमान व छळ झाला; तर कधी अशाच गोष्टी सहन करणार्‍यांबरोबर तुम्ही जोडीने उभे राहिला.

  11. बंदिवानांबरोबर तुम्ही दुःख सोसले आणि अधिक चांगली व टिकाऊ मालमत्ता आपल्याजवळ आहे हे समजून तुम्ही स्वतःच्या मालमत्तेची जप्ती आनंदाने स्वीकारली.

  12. तुमचा विश्वास सोडू नका, त्याचे मोठे प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे.

  13. काहींची हेटाळणी झाली आणि त्यांना चाबकांचे फटके मारले गेले, तर इतरांना बेड्या ठोकून तुरुंगात टाकण्यात आले.

  14. आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्‍या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि ते परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे.

  15. ज्यांनी आपणाविरुद्ध पाप करणार्‍यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा म्हणजे तुम्ही थकून न जाता तुमच्या मनांचा धीर सुटणार नाही.

  16. म्हणून, ज्याअर्थी ख्रिस्ताने त्यांच्या शरीरामध्ये दुःख सहन केले, त्याअर्थी तुम्ही सुद्धा तीच मनोवृत्ती धारण केली पाहिजे, कारण जो कोणी शरीरामध्ये दुःख सहन करतो तो पापाचा त्याग करतो.

  17. परंतु ख्रिस्ताच्या दुःखात जेवढे तुम्हाला सहभागी होता येईल तेवढे होऊन आनंद करा, म्हणजे ज्यावेळी त्यांचे गौरव प्रकट होईल त्यावेळी तुम्ही अतिआनंदीत व्हाल.

  18. तरीपण ख्रिस्ती या नात्याने तुम्ही दुःख सहन केले तर लाज मानू नका, तर परमेश्वराची स्तुती करा की तुम्ही ते नाव धारण केले आहे.

  19. म्हणून जे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करतात त्यांनी स्वतःला त्यांच्या विश्वासू निर्माणकर्त्याकडे सोपवून द्यावे आणि नेहमी चांगली कामे करीत राहवे.

  20. उलट, आपला इतका छळ करणार्‍या या दोन संदेष्ट्यांच्या मृत्यूबद्दल सर्व जगभर लोक जागोजागी आनंदोत्सव करतील, एकमेकांना भेटी देतील.