मुख्य मजकुरावर जा

Persecution बद्दल बायबलमधील वचने

270 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मला माहीत आहे की तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात आणि असे असतानाही तुम्ही मला जिवे मारण्याचा मार्ग शोधत आहात, कारण माझ्या वचनांना तुमच्यामध्ये स्थान नाही.

  2. परंतु त्याऐवजी परमेश्वराकडून ऐकलेले सत्य मी तुम्हाला सांगितले, म्हणून तुम्ही मला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहात, अब्राहामाने असे कृत्य कधीही केले नव्हते.

  3. यहूदी पुढार्‍यांनी त्यांना उत्तर दिले, “आम्ही खरे सांगत नव्हतो का की तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हाला भूत लागलेले आहे?”

  4. यावर त्यांनी उद्गार काढले, “आता आमची खात्री झाली की, तुला भूत लागले आहे! प्रत्यक्ष अब्राहाम व संदेष्टेही मरण पावले आणि तरी तू म्हणतो की तुझी वचने पाळणार्‍यांना मृत्यूचा अनुभव कधीही येणार नाही.

  5. हे ऐकल्याबरोबर त्यांनी येशूंना मारण्यासाठी दगड उचलले, परंतु येशू त्यांच्यापासून लपून मंदिराच्या आवारातून निघून गेले.

  6. त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “तो एकतर भूतग्रस्त अथवा वेडा तरी असावा. अशा माणसाचे तुम्ही का ऐकता?”

  7. तेव्हा यहूदी विरोधकांनी त्यांना दगडमार करण्यासाठी पुन्हा दगड उचलले,

  8. त्यांना अटक करण्याचा त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या हातातून निसटून गेले.

  9. इकडे मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी उघडपणे आज्ञा केली की, येशू कोणाला आढळल्यास त्याने ताबडतोब सूचना द्यावी म्हणजे ते त्यांना अटक करतील.

  10. आता मी तुम्हाला यापेक्षा अधिक सांगणार नाही, कारण या जगाचा अधिपती येत आहे. त्याचा मजवर काहीही अधिकार नाही,

  11. “जर जगाने तुमचा द्वेष केला, तर हे लक्षात ठेवा की त्यांनी प्रथम माझाही द्वेष केला आहे.

  12. मी तुम्हाला जे सांगितले याची आठवण ठेवा: ‘दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही.’ जर त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील. त्यांनी माझी वचने पाळली, तर ते तुमची ही पाळतील!

  13. माझ्या नावामुळे ते तुमच्याशी असे वागतील, कारण ज्यांनी मला पाठविले त्यांना ते ओळखीत नाहीत.

  14. जे कोणीही केले नाही, ते कार्य मी त्यांच्यामध्ये केले नसते, तर ते दोषी समजले गेले नसते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, त्यांनी आम्हा दोघांचा, म्हणजे माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला आहे.

  15. ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला,’ असे त्यांच्या नियमात जे म्हटले आहे, ते पूर्ण झाले आहे.

  16. ते अशा गोष्टी करतील कारण त्यांनी कधीही पित्याला किंवा मला ओळखले नाही.

  17. येशूने असे म्हटल्यावर, जवळ असणार्‍या अधिकार्‍यांपैकी एकाने येशूंच्या तोंडावर चापट मारली व “अशा रीतीने तू महायाजकाला उत्तर देतो काय?” त्याने दरडावून मागणी केली.

  18. येशूने उत्तर दिले, “मी जर काही चुकीचे बोललो असेल तर तसे सिद्ध करा. परंतु मी सत्य बोललो असेन, तर तुम्ही मला का मारले?”

  19. तेव्हा पिलात त्यांच्याकडे बाहेर आला आणि त्याने त्यांना विचारले, “या मनुष्याविरुद्ध तुमचे काय आरोप आहेत?”

  20. पिलाताला उलट निरोप देत ते म्हणाले, “तो गुन्हेगार नसता तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केलेच नसते!”

  21. परमेश्वराच्या पूर्वनियोजित योजनेप्रमाणे व त्यांच्या पूर्वज्ञानानुसार या मनुष्यास तुमच्या हातात सोपवून दिले आणि तुम्ही दुष्ट लोकांच्या मदतीने, त्यांना क्रूसावर खिळे ठोकून जिवे मारले.

  22. अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचे परमेश्वर, जे आपल्या पूर्वजांचे परमेश्वर आहेत, त्यांनी त्यांचा सेवक येशूंना गौरविले आहे. त्याच येशूंना मारून टाकले जावे यासाठी तुम्ही त्यांना धरून दिले आणि पिलातासमोर तुम्ही त्यांना नाकारले. जरी पिलाताने त्यांना सोडून देण्याचा निश्चय केला होता,

  23. तरी तुम्ही पवित्र व नीतिमानाशी संबंध ठेवण्यास नकार दिला व त्याऐवजी एका खुनी माणसाच्या मुक्ततेची मागणी केली.

  24. तुम्ही प्रत्यक्ष जीवनाच्या निर्माणकर्त्यालाच जिवे मारले, परंतु परमेश्वराने त्यांना मरणातून पुन्हा उठविले, याचे आम्ही साक्षी आहोत.

  25. त्यांनी पेत्र व योहानाला अटक केली आणि संध्याकाळ झाल्यामुळे त्यांना दुसर्‍या दिवशीही कैदेतच ठेवले.