मुख्य मजकुरावर जा

Daniel

72 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Belteshazzar

Daniel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. राजा दानीएलला म्हणाला, “निश्चितच तुझा परमेश्वर देवांचा देव आणि राजांचा प्रभू आणि रहस्ये उघड करणारा आहे, कारण तू या रहस्याचा अर्थ समजावून सांगण्यास योग्य ठरला आहे.”

  2. मग राजाने दानीएलला उच्चपदास चढविले, त्याला अनेक मौल्यवान देणग्या दिल्या. त्याने संपूर्ण बाबेलप्रांतावर त्याला प्रमुख अधिपती नेमले आणि सर्व ज्ञानी लोकांवर प्रमुख अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली.

  3. मग दानीएलच्या विनंतीवरून राजाने शद्रख, मेशख व अबेदनगो यांना बाबेल प्रांताचा प्रशासक सहायक म्हणून नेमले, परंतु की दानीएल राजाच्या दरबारातच राहिला.

  4. अखेरीस दानीएल माझ्या उपस्थितीत आला आणि मी त्याला माझे स्वप्न सांगितले. (माझ्या देवाच्या नावावरून मी त्याचे बेलटशास्सर असे नाव ठेवले होते. याच माणसामध्ये पवित्र देवाचा आत्मा आहे.)

  5. मी म्हणालो, “हे बेलटशास्सर, धुरंधर जादुगारा, पवित्र देवाचा आत्मा तुझ्यामध्ये आहे हे मला ठाऊक आहे आणि तुझ्यासाठी कोणतेच रहस्य कठीण नाही. माझे हे स्वप्न आहे; मला त्याचा अर्थ सांग.

  6. “हे स्वप्न आहे जे मी, राजा नबुखद्नेस्सरने पाहिले. हे बेलटशास्सर, आता याचा अर्थ काय तो मला सांग, कारण माझ्या राज्यात कोणताही ज्ञानी मनुष्य मला त्याचा अर्थ सांगू शकत नाही. फक्त तूच मला अर्थ सांगू शकशील, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्यामध्ये आहे.”

  7. नंतर दानीएल (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जात), काही वेळेसाठी व्याकूळ झाला आणि त्याचे विचार त्याला भयभीत करू लागले. म्हणून राजा म्हणाला, “हे बेलटशास्सर, माझे स्वप्न किंवा त्याचा अर्थ यामुळे भयभीत होऊ नको.” तेव्हा बेलटशास्सराने (अर्थात् दानीएलाने) उत्तर दिले, “महाराज, जर हे स्वप्न तुमच्या शत्रूंवर आणि त्याचा अर्थ तुमच्या विरोधकांवर ओढवला असता, तर किती बरे झाले असते!

  8. त्याने हे केले कारण दानीएल हा ज्याला राजा बेलटशास्सर म्हणत होता, त्याच्याकडे उत्तम मन आणि ज्ञान आणि समज होती आणि त्याच्याकडे स्वप्नांचा अर्थ सांगण्याचे, कोडे सोडविण्याचे आणि कठीण समस्या सोडविण्याची क्षमता होती. म्हणून दानीएलला बोलवा म्हणजे तो तुम्हाला त्या लिखाणाचा अर्थ सांगेल.”

  9. तेव्हा दानीएलला राजासमोर आणण्यात आले आणि राजाने त्याला म्हटले, “दानीएल तो तूच आहेस काय, ज्याला माझे पिता राजा यांनी यहूदीयातून कैदी म्हणून आणला होता?

  10. दानीएलने राजाला उत्तर दिले. “आपल्या देणग्या आपल्याजवळच ठेवा आणि तुमचे पारितोषिक दुसर्‍या कोणाला द्या. तरीही मी हे लिखाण राजासाठी वाचेन आणि त्याचा अर्थ त्यांना सांगेन.

  11. नंतर बेलशस्सरच्या आज्ञेवरून दानीएलला जांभळा पोशाख घालण्यात आला. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात आली व तो राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचा अधिपती आहे, असे जाहीर करण्यात आले.

  12. व त्यांच्यावर तीन अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली होती, ज्यामध्ये दानीएल एक होता. राजाला कोणत्याच प्रकारची हानी होऊ नये म्हणून प्रांताधिकार्‍यांनी त्यांना हिशोब द्यावा.

  13. दानीएल हा अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यापेक्षा त्याच्या विलक्षण गुणांमुळे सरस असल्यामुळे शासक म्हणून त्यालाच संपूर्ण साम्राज्यावर नेमावे अशी राजाची योजना होती.

  14. यामुळे अध्यक्ष आणि प्रांताधिकारी दानीएलविरुद्ध राज्य कारभारातील दोष शोधण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना त्याच्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार आढळला नाही, कारण तो विश्वासू होता आणि तो भ्रष्ट नव्हता किंवा निष्काळजीपणाही करीत नव्हता.

  15. शेवटी हे लोक म्हणाले, “आम्हाला दानीएलाविरुद्ध त्याच्या परमेश्वराच्या नियमाशिवाय कोणत्याही बाबतीत आरोपाचे कारण सापडणार नाही.”

  16. जेव्हा दानीएलला हे फर्मान निघाल्याचे समजले, तेव्हा तो घरी गेला व माडीवर खोलीत गेला. या खोलीच्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे उघडलेल्या होत्या. आपल्या नित्याच्या रिवाजाप्रमाणे दिवसातून तीन वेळा त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि त्याच्या परमेश्वराचे आभार मानले.

  17. नंतर हे लोक त्याच्या घरी जमावाने आले आणि त्यांनी दानीएलला परमेश्वराला प्रार्थना करताना व मदत मागताना पाहिले.

  18. नंतर ते राजाला म्हणाले, “महाराज, यहूदी कैद्यांपैकी दानीएल, तो आपली किंवा आपल्या फर्मानाची मुळीच पर्वा करीत नाही. तो आताही दिवसातून तीन वेळा प्रार्थना करतो.”

  19. जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो फारच अस्वस्थ झाला; दानीएलला यातून वाचवावे असा त्याने निश्चय केला आणि त्याने सूर्यास्त होईपर्यंत दानीएलला कसे सोडवावे याचे सर्वतोपरी प्रयत्न केले.

  20. तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!”

  21. आणि एक मोठी शिळा आणण्यात आली आणि गुहेच्या तोंडावर ठेवली व राजाने आपल्या स्वतःच्या आणि अधिकार्‍यांच्या मुद्रांनी शिक्कामोर्तब केले, जेणेकरून दानीएलच्या परिस्थितीत कोणताच बदल करता येऊ नये.

  22. जेव्हा राजा गुहेच्या जवळ आला, त्याने दानीएलला मोठ्या दुःखाने त्याने हाक मारली. “दानीएला, दानीएला, जिवंत परमेश्वराच्या सेवका, ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस, त्यांनी तुला सिंहांपासून सोडविले आहे काय?”

  23. तेव्हा दानीएलने उत्तर दिले, “महाराज चिरायू असो!

  24. तेव्हा राजा अतिशय आनंदित झाला आणि दानीएलला गुहेतून बाहेर काढण्याचा त्याने हुकूम सोडला. जेव्हा दानीएलला गुहेतून वर काढण्यात आले, तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती, कारण त्याने आपल्या परमेश्वरावर भरवसा ठेवला होता.

  25. नंतर राजाने आज्ञा केली त्याप्रमाणे दानीएलवर खोटे आरोप करणार्‍यांना पकडण्यात आले व त्यांच्या पत्नी व मुलांसहित त्या सर्वांना सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. आणि ते गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सिंहांनी प्रबळ होऊन झेप घातली आणि त्यांच्या सर्व हाडांचे तुकडे केले.