मुख्य मजकुरावर जा

Abraham

277 वचने · 14 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Abram

Abraham चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अब्राहामाने लवून नमस्कार केला; आणि तो हसला व स्वतःशी म्हणाला, “शंभर वर्षांच्या माणसालाही मुले होतील का? नव्वद वर्षांच्या साराहच्या पोटी बाळ जन्माला येऊ शकेल काय?”

  2. तेव्हा अब्राहामाने परमेश्वराला म्हटले, “केवळ इश्माएल तुमच्या आशीर्वादाखाली राहिला तरी पुरे!”

  3. जेव्हा त्याने अब्राहामाशी बोलणे संपविले तेव्हा परमेश्वर अंतर्धान पावले.

  4. त्याच दिवशी अब्राहामाने आपला पुत्र इश्माएल आणि आपल्या घरात जन्मलेले किंवा पैसे देऊन विकत घेतलेले सर्व पुरुष यांची परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे सुंता केली.

  5. अब्राहामाची सुंता झाली त्यावेळी तो नव्याण्णव वर्षांचा होता,

  6. अब्राहाम व त्याचा पुत्र इश्माएल या दोघांचीही सुंता एकाच दिवशी झाली.

  7. मग अब्राहाम धावत आपल्या तंबूत येऊन साराहला म्हणाला, “लवकर तीन सिआ सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”

  8. नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे गेला, त्यातील एक कोवळे व उत्तम वासरू त्याने निवडले आणि ते लवकर बनवावे म्हणून एका नोकराकडे दिले.

  9. आता अब्राहाम व साराह दोघेही खूप वृद्ध झाली होती. साराहला मुले होण्याचा काळ केव्हाच निघून गेला होता;

  10. तेवढ्यात याहवेहने अब्राहामाला विचारले, “ ‘माझ्यासारख्या वृद्धेला खरेच मूल होईल काय?’ असे म्हणत साराह का हसली?

  11. जेव्हा ते पुरुष पुढील प्रवासास जाण्यास उठले आणि त्यांनी खाली सदोमाच्या दिशेने पाहिले. अब्राहाम त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्याबरोबर थोडी वाट चालून गेला.

  12. मग याहवेह म्हणाले, “अब्राहामापासून मी माझा संकल्प गुप्त ठेवावा काय?

  13. कारण खात्रीने अब्राहाम एक महान व बलाढ्य राष्ट्र होईल आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.

  14. कारण मी त्याला निवडले आहे अशासाठी की त्याने त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना व त्याच्या घराण्याला याहवेहच्या मार्गात जे योग्य व न्यायी आहे, त्यात चालवावे, त्यामुळे अब्राहामाला दिलेले अभिवचन याहवेह पूर्ण करतील.”

  15. त्याच्याबरोबर असलेले पुरुष सदोमाच्या दिशेने गेले, पण अब्राहाम याहवेहपुढे उभा राहिला.

  16. अब्राहाम त्यांच्याजवळ गेला आणि विचारले: “तुम्ही दुष्टांबरोबर नीतिमानांचा सुद्धा नाश करणार काय?

  17. मग अब्राहाम पुन्हा म्हणाला, “मी धूळ आणि राख असून, मी प्रभूशी बोलण्याचे धैर्य केले आहे,

  18. जेव्हा याहवेहने अब्राहामाशी आपले बोलणे संपविले, ते निघून गेले आणि अब्राहाम घरी परतला.

  19. दुसर्‍या दिवशी अब्राहाम पहाटेच उठला आणि ज्या ठिकाणी तो याहवेहसमोर उभा राहिला होता त्या ठिकाणी आला.

  20. मग जेव्हा परमेश्वराने त्या नगरांचा नाश केला, त्यांना अब्राहामाची आठवण आली आणि त्यांनी ज्या नगरास मृत्यूने विळखा घातला होता त्या लोट राहात असलेल्या नगरातून त्याला सोडविले.

  21. आता अब्राहाम तिथून दक्षिणेस नेगेव प्रांताकडे गेला आणि त्याने कादेश आणि शूर यांच्या दरम्यान वस्ती केली. काही काळासाठी तो गरार नगरात राहिला,

  22. साराह आपली बहीण असल्याचे अब्राहामाने सांगितले, तेव्हा गरारचा राजा अबीमेलेख याने माणसे पाठवून सारेला आपल्याकडे आणले.

  23. मग अबीमेलेखाने अब्राहामास बोलावून विचारणा केली, “हे तू आमच्याशी काय केलेस? मी असे काय अपराध केले की, मला तुझ्याकडून अशी वागणूक मिळावी आणि त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या राज्यावर घोर पातक आणले? जे कृत्य कधीही करू नये ते तू माझ्याशी केले आहेस.”

  24. मग अबीमेलेखाने अब्राहामास विचारले, “तू हे असे करण्याचे काय कारण आहे?”

  25. अब्राहाम म्हणाला, “मी मनात विचार केला, ‘या शहरात कोणीही परमेश्वराला भीत नाही आणि माझ्या पत्नीमुळे ते माझा वध करतील.’