मुख्य मजकुरावर जा

Abraham

277 वचने · 14 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Abram

Abraham चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. या लढाईत वाचलेला एक मनुष्य इब्री अब्रामाकडे पळून आला व त्याने ही बातमी त्याला सांगितली. त्यावेळी अब्राम, अमोरी मम्रे याच्या एला राईत तळ देऊन राहिला होता. अष्कोल व आनेर हे दोघे मम्रेचे भाऊ होते व त्यांनी अब्रामासोबत करार केला होता.

  2. लोटाला कैद करून नेल्याचे अब्रामाला समजल्याबरोबर त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या तीनशेअठरा प्रशिक्षित पुरुषांना बरोबर घेतले आणि घरी परतणार्‍या विजयी सैन्याचा थेट दानपर्यंत पाठलाग केला.

  3. आणि त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ते परात्पर परमेश्वराद्वारे अब्राम आशीर्वादित असो.

  4. सदोमच्या राजाने अब्रामाला म्हटले, “लोक मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा.”

  5. यावर अब्रामाने सदोमाच्या राजाला उत्तर दिले, “आकाश व पृथ्वी यांना निर्माण करणारा परात्पर याहवेह परमेश्वर यांना मी हात उंच करून वचन दिले आहे,

  6. ‘मी अब्रामाला श्रीमंत बनविले आहे,’ असे तुला कधीही म्हणता येऊ नये म्हणून मी तुझ्यापासून सुतळीचा एक दोरा किंवा जोड्याचा बंदही घेणार नाही.

  7. या गोष्टीं घडल्यानंतर अब्रामाला दृष्टान्तात याहवेहकडून हा संदेश मिळाला: “अब्रामा, भिऊ नको; मीच तुझी ढाल, तुझे अत्यंत महान प्रतिफळ आहे.”

  8. यावर अब्राम म्हणाला, “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही मला काय देऊ शकणार, मला पुत्र नसल्यामुळे माझ्या सर्व मालमत्तेचा वारस तर दिमिष्काचा एलिएजर होईल ना?”

  9. अब्रामाने असेही म्हटले, “तुम्ही मला पुत्र दिलेला नाही; म्हणून माझा सेवकच माझा वारस होईल.”

  10. त्या प्राण्यांच्या मृतशरीरांवर गिधाडांनी झडप घातली, तेव्हा अब्रामाने गिधाडांना हुसकावून लावले.

  11. सूर्यास्ताच्या वेळी अब्रामाला गाढ निद्रा लागली आणि त्याच्यावर दाट आणि भयानक गडद अंधार पडला.

  12. मग याहवेहने अब्रामाला म्हटले, “हे निश्चितपणे जाणून घे की, तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल.

  13. त्या दिवशी याहवेहने अब्रामाशी करार केला; त्यांनी म्हटले, “मी तुझ्या वंशजांना इजिप्त देशाच्या नदीपासून फरात नदीपर्यंतचा जो सर्व प्रदेश—

  14. अब्रामाला साराय आपली पत्नी हिच्यापासून मूलबाळ नव्हते. पण सारायला हागार नावाची इजिप्तची एक दासी होती;

  15. सारायने अब्रामाला म्हटले, “याहवेहने मला मूलबाळ दिले नाही, म्हणून तू माझ्या दासीचा स्वीकार कर; म्हणजे तिच्यापासून माझी मुले होतील.” आणि अब्रामाने तिचा शब्द मानला.

  16. अब्राम कनान देशात राहून दहा वर्षे झाली होती. अब्रामाची पत्नी साराय हिने आपली इजिप्तची दासी हागार हिला अब्रामाची पत्नी होण्यासाठी त्याच्याकडे सोपविले.

  17. मग साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्याशी होत असलेल्या अन्यायास तुम्ही जबाबदार आहात. वास्तविक, मी तिला तुमच्या हातात दिले आणि आता जेव्हा तिला कळले की ती गर्भवती आहे, ती मला तुच्छ मानू लागली आहे. याहवेह माझ्या व तुमच्यामध्ये न्याय करो.”

  18. यावर अब्रामाने सारायला उत्तर दिले, “तुझ्या दासीवर तुझा पूर्ण अधिकार आहे. तुला जे योग्य वाटेल ते तिच्याशी कर.” तेव्हा सारायने हागारची छळणूक केली; आणि हागार तिच्यापासून पळून गेली.

  19. मग अब्रामाला हागारेपासून एक पुत्र झाला आणि तिच्यापासून झालेल्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल असे ठेवले.

  20. हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला त्यावेळी अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.

  21. अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा.

  22. अब्रामाने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला आणि परमेश्वर त्याला म्हणाले,

  23. आता येथून पुढे तुझे नाव अब्राम असे राहणार नाही, तर ते अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.

  24. मग परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “माझ्याशी केलेल्या कराराचे तू आणि तुझ्या येणार्‍या वंशजांनी पिढ्यान् पिढ्या पर्यंत पालन करावे.

  25. मग परमेश्वराने अब्राहामालाही म्हटले, “तुझी पत्नी साराय हिचे नाव आता साराय राहणार नाही, तर तिचे नाव साराह असे होईल.