Gerar
31.3900, 34.5600 गूगल नकाशावर पाहा
Gerar चा उल्लेख असलेली वचने
आणि सीदोनापासून गरारपासून गाझाच्या पट्ट्यातील, सदोम, गमोरा, अदमाह व लेशाजवळील सबोईम येथवर कनानाची सीमा पसरली.)
आता अब्राहाम तिथून दक्षिणेस नेगेव प्रांताकडे गेला आणि त्याने कादेश आणि शूर यांच्या दरम्यान वस्ती केली. काही काळासाठी तो गरार नगरात राहिला,
साराह आपली बहीण असल्याचे अब्राहामाने सांगितले, तेव्हा गरारचा राजा अबीमेलेख याने माणसे पाठवून सारेला आपल्याकडे आणले.
त्या देशात दुष्काळ पडला—अब्राहामाच्या काळात पडला त्या खेरीज हा दुसरा दुष्काळ होता—म्हणून इसहाक गरार या शहरात पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याजकडे गेला.
म्हणून इसहाक गरारातच राहिला.
मग गरारचे गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले आणि म्हणाले, “हे पाणी आमचे आहे!” म्हणून त्याने विहिरीला एसेक असे नाव दिले; कारण त्यांचे त्याच्याशी भांडण झाले.
एके दिवशी त्याला भेटण्यासाठी गरारहून अबीमेलेख, त्याचा सल्लागार अहुज्जाथ आणि त्याचा सेनापती पीकोल हे आले.
आणि आसा आणि त्याच्या सैन्याने गरारपर्यंत त्यांचा पाठलाग केला. एवढ्या मोठ्या संख्येने कूशी पडले की ते परत स्वतःला उभारू शकले नाहीत; याहवेह आणि त्यांच्या सैन्यासमोर त्यांचा चुराडा झाला. यहूदीयाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर लुटालूट करून नेली.
गरारच्या सभोवतालची सर्व गावे त्यांनी उद्ध्वस्त केली, कारण याहवेहची दहशत त्यांच्यावर पसरली होती. त्यांनी ही सर्व गावे लुटली, कारण तिथे लुटण्यासारखी पुष्कळ सामुग्री होती.