Skip to content

Ethiopia बद्दल बायबलमधील वचने

48 वचने · 15 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेरह कूशी याने हजारोंच्या हजार संख्येने सैन्य आणि तीनशे रथ बरोबर घेऊन त्यांच्याविरुद्ध चढाई केली आणि तो मारेशाहपर्यंत आला.

  2. आसाने त्याचा सामना करण्यासाठी आगेकूच केले आणि ते मारेशाहजवळ असलेल्या जेफथाह खोऱ्यात युद्धासाठी स्थानबद्ध झाले.

  3. तेव्हा आसाने त्याचे परमेश्वर याहवेहना हाक मारली आणि म्हणाला, “याहवेह, दुर्बल लोकांना पराक्रमी लोकांविरुद्ध मदत करणारे तुमच्यासारखे कोणी नाही. आमच्या परमेश्वरा, याहवेह आम्हाला मदत करा, कारण आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत आणि तुमच्याच नावामध्ये आम्ही या विशाल सैन्याविरुद्ध आलो आहोत. याहवेह, तुम्ही आमचे परमेश्वर आहात; मर्त्य मानवांनी तुमच्यावर विजयी होऊ नये.”

  4. तेव्हा याहवेहनी आसा आणि यहूदीया यांच्यासमोर कूशी लोकांना तडाखा दिला. कूशी लोक पळून गेले,

  5. आणि आसा आणि त्याच्या सैन्याने गरारपर्यंत त्यांचा पाठलाग केला. एवढ्या मोठ्या संख्येने कूशी पडले की ते परत स्वतःला उभारू शकले नाहीत; याहवेह आणि त्यांच्या सैन्यासमोर त्यांचा चुराडा झाला. यहूदीयाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर लुटालूट करून नेली.

  6. गरारच्या सभोवतालची सर्व गावे त्यांनी उद्ध्वस्त केली, कारण याहवेहची दहशत त्यांच्यावर पसरली होती. त्यांनी ही सर्व गावे लुटली, कारण तिथे लुटण्यासारखी पुष्कळ सामुग्री होती.

  7. त्यांनी गुरांच्या छावण्यांवरही हल्ला केला आणि मेंढ्या, शेळ्या आणि उंटांचे कळप उचलून नेले. नंतर ते यरुशलेमकडे परतले.

  8. कूशच्या नद्यांच्या काठावर असलेल्या देशांचा, जिथून पंखांचा फडफड आवाज येतो त्यास धिक्कार असो.

  9. जो समुद्रमार्गाने पाण्यावरून पापिरस नौकांमधून दूतांना पाठवितो. जा, जलदगतीने जाणाऱ्या दूतांनो, धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडे जा, त्यांची जबर असलेल्या दूरवरच्या लोकांकडे, विक्षिप्त भाषण करणारे आक्रमक राष्ट्र, ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे.

  10. अहो तुम्ही जगातील सर्व लोकहो, तुम्ही जे पृथ्वीवर राहता, जेव्हा पर्वतांवर झेंडा उभारला जाईल, तेव्हा तुम्हाला तो दिसेल, आणि जेव्हा तुतारी वाजेल तेव्हा तुम्ही ती ऐकाल.

  11. याहवेह मला असे म्हणतात: “मी शांत राहीन आणि माझ्या निवासस्थानातून पाहीन, सूर्यप्रकाशामध्ये चमकणाऱ्या उष्णतेसारखे, दव असलेले ढग कापणीच्या उन्हात असल्यासारखे.”

  12. कारण, कापणीच्या आधी, जेव्हा फुलोरा संपेल आणि फुले पिकलेले द्राक्ष होतात, ते छाटणीच्या सुऱ्यांनी फुटलेले कोंब कापून टाकतील, आणि पसरत असलेल्या फांद्या कापून टाकतील आणि काढून टाकतील.

  13. डोंगरावरील हिंस्र पक्ष्यांसाठी आणि वन्यप्राण्यांसाठी, भक्ष्य म्हणून त्या सर्वांना तिथेच सोडले जाईल; संपूर्ण उन्हाळ्यात पक्षी त्यांचे भक्षण करतील, आणि संपूर्ण हिवाळ्यात वन्यप्राणी त्यांचे भक्षण करतील.

  14. त्यावेळेस आमोजचा पुत्र यशायाहद्वारे याहवेह बोलले. ते त्याला म्हणाले, “तुझ्या अंगावरील गोणपाट आणि पायातील चपला काढून टाक.” आणि त्याने तसे केले, वस्त्रहीन आणि अनवाणी असा तो फिरत राहिला.

  15. तेव्हा याहवेह म्हणाले, “जसा माझा सेवक यशायाह तीन वर्षे विवस्त्र आणि अनवाणी चालला, त्याचप्रमाणे इजिप्त व कूश यांच्याविरुद्ध हे चिन्ह आणि अरिष्टसूचक गोष्ट असेल,

  16. म्हणून अश्शूरचा राजा इजिप्तच्या बंदिवानांना आणि कूशच्या बंदिवानांना, तरुणांना आणि वृद्धांना उघडे ठेवलेले नितंब आणि अनवाणी असे—इजिप्तला लज्जित म्हणून चालवेल.

  17. ज्यांनी कूशवर विश्वास ठेवला आणि इजिप्तबद्दल बढाई मारली ते निराश होतील आणि लज्जित होतील.

  18. त्या दिवशी या किनार्‍यावर राहणारे लोक असे म्हणतील की, ‘ज्यांच्यावर आम्ही विसंबून होतो, पहा हे त्यांचे काय झाले आहे. ज्यांच्याकडे आम्ही मदतीसाठी आणि अश्शूरच्या राजापासून आमची सुटका व्हावी यासाठी धाव घेतली होती, तर आता आमची सुटका कशी होईल?’ ”

  19. यिर्मयाहला राजवाड्यातील अंधार विहिरीत टाकले आहे, हे वृत्त यरुशलेमच्या राजवाड्यातील एबेद-मेलेख नावाच्या एका प्रमुख अधिकार्‍याने ऐकले. तो कूशी देशाचा मूळ रहिवासी होता. यावेळी राजा बिन्यामीन वेशीपाशी बसला होता.

  20. एबेद-मेलेख लागलीच राजवाड्याच्या बाहेर गेला व राजाला म्हणाला,

  21. “महाराज, माझे स्वामी, या माणसांनी यिर्मयाह संदेष्ट्याला अंधार विहिरीत टाकले, हे फार वाईट कृत्य केले आहे. तिथे तो उपासमारीने मरेल, कारण शहरातील सर्व भाकर संपली आहे.”

  22. मग राजाने कूशी एबेद-मेलेखला सांगितले, “तू तीस माणसे घेऊन जा आणि यिर्मयाह संदेष्टा मरण्याआधीच त्याला त्या अंधार विहिरीतून बाहेर काढ.”

  23. तेव्हा इथिओपी एबेद-मेलेखने माणसे घेतली आणि तो राजवाड्यातील एका कोठारात गेला. तिथे टाकून दिलेल्या वस्तू व जुने कपडे ठेवलेले होते. तिथून काही चिंध्या व जुने कपडे घेऊन तो अंधार विहिरीकडे गेला व दोरीला बांधून ते बोचके त्याने खाली यिर्मयाहकडे विहिरीत सोडले.

  24. कूशी एबेद-मेलेखने यिर्मयाहला सांगितले, “तुला दोर्‍या काचू नयेत म्हणून या चिंध्या आपल्या बगलेत ठेव.” यिर्मयाहने त्याप्रमाणे केल्यावर

  25. यिर्मयाहला त्यांनी ओढून अंधार विहिरीतून बाहेर काढले व परत राजवाड्यातील अंगणात आणले व तिथे तो राहिला.