मुख्य मजकुरावर जा

Ethiopia बद्दल बायबलमधील वचने

48 वचने · 15 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह पहारेकऱ्यांच्या आंगणातच असताना त्याला याहवेहचे वचन आले:

  2. “जा आणि कूशी एबेद-मेलेखला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी या शहराविरुद्ध दिलेली माझी वचने पूर्ण करण्याची वेळ आली आहे—समृद्धी नव्हे तर विध्वंस. तुझ्या डोळ्यादेखत मी ते पूर्ण करेन.

  3. परंतु त्या दिवशी तुझी मात्र मी सुटका करेन, असे याहवेह जाहीर करतात; ज्यांची तुला भीती वाटते, त्यांच्या हातात तुला देणार नाही.

  4. मी तुला वाचवेन; तलवारीने तुझा वध होणार नाही, पण मी तुझा जीव वाचवेन, कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे याहवेह जाहीर करतात.’ ”

  5. इजिप्तविरुद्ध एक तलवार येईल आणि कूशवर वेदना येतील. जेव्हा वधलेले इजिप्तमध्ये पडतील, तिची संपत्ती काढून घेतली जाईल आणि तिचे पाये मोडून टाकले जातील.

  6. कूश आणि लिबिया, लूद व संपूर्ण अरब, कूब आणि कराराच्या देशाचे लोक इजिप्तबरोबर तलवारीने पडतील.

  7. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘इजिप्तचे मित्रगण पडतील तिचे अहंकारी बळ सुद्धा पडेल. मिग्दोलपासून असवानपर्यंत सर्व तिच्यामध्ये तलवारीने पडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  8. सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये, ते ओसाड पडतील, आणि त्यांची शहरे उद्ध्वस्त झालेल्या शहरांमध्ये पडतील.

  9. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे, मी जेव्हा इजिप्तला आग लावेन, तेव्हा तिला मदत करणार्‍यांचाही चुरा होईल.

  10. “ ‘त्या दिवशी त्या कूशी लोकांना घाबरवून त्यांच्या निश्चिंतेतून बाहेर काढावे म्हणून माझ्याकडून जहाजामध्ये संदेष्टे जातील. इजिप्तच्या नाशाच्या दिवशी वेदना त्यांचा ताबा घेईल, कारण तो दिवस खचितच येत आहे.

  11. तेव्हा तो निघाला आणि जात असताना रस्त्यावर त्याला इथिओपिया देशाचा एक षंढ भेटला, हा षंढ इथिओपियाची राणी कांदकेचा महत्त्वाचा अधिकारी व खजिनदार होता. हा मनुष्य यरुशलेमला आराधना करण्यासाठी आला होता,

  12. आणि आता घरी परत जात असताना तो त्याच्या रथामध्ये बसून यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता.

  13. तेव्हा पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “तू रथ गाठ आणि त्याच्या जवळच चालत राहा.”

  14. मग फिलिप्प धावत रथापर्यंत गेला आणि तो खोजा यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. ते ऐकून त्याने त्याला विचारले, “आपण जे वाचत आहात ते आपणास समजते काय?”

  15. तो म्हणाला, “कोणीतरी स्पष्टीकरण करून सांगितल्याशिवाय हे मला कसे समजेल?” म्हणून त्याने फिलिप्पाला विनंती केली की, त्याने रथात चढून त्याच्याजवळ बसावे.

  16. शास्त्रलेखातील जो उतारा तो षंढ वाचीत होता तो असा होता: “वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.

  17. त्याच्या लीन अवस्थेत तो न्यायापासून वंचित राहिला. त्याच्या वंशजांबद्दल कोण बोलू शकेल? कारण त्याचे जीवन पृथ्वीवरून काढून घेण्यात आले होते.”

  18. षंढाने फिलिप्पाला विचारले, “संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे, स्वतःविषयी किंवा दुसर्‍या कोणाविषयी?”

  19. तेव्हा फिलिप्पाने त्याच शास्त्रलेखापासून सुरुवात करून त्याला येशूंची शुभवार्ता सांगितली.

  20. तसेच पुढे प्रवास करीत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका जलाशयाजवळ ते आले आणि त्याचवेळेस षंढ म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे. माझा बाप्तिस्मा होण्यासाठी काही अडचण आहे काय?”

  21. फिलिप्पाने उत्तर दिले, “आपण पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरीत असाल, तर आपला बाप्तिस्मा होऊ शकतो.” आणि षंढाने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा मी विश्वास ठेवतो.”

  22. मग त्याने रथ थांबविण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ दोघेही खाली पाण्यात उतरले आणि फिलिप्पाने त्याला बाप्तिस्मा दिला.

  23. ते पाण्यातून वर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने एकाएकी फिलिप्पाला उचलून नेले आणि त्या षंढाला तो पुन्हा कधीही दिसला नाही. तो आनंद करीत त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला.