Skip to content

Assyria

115 verses · 5 known names

हे नावानेही ओळखले जाते: Asshur, Assur, Assyrian, Assyrians

36.3500, 43.1500 गूगल नकाशावर पाहा

Assyria चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शिनारपासून त्याने आपल्या राज्याचा विस्तार अश्शूरपर्यंत केला. त्याने निनवेह, रेहोबोथ ईर व कालह

  2. त्याचे वंशज हवीलापासून शूर देशापर्यंत वस्ती करून राहिले. हा देश इजिप्त देशाच्या सीमेवर अश्शूरच्या बाजूला आहे. ते एकमेकांशी वैराभावाने राहत होते.

  3. तेव्हा अश्शूरचा राजा पूल ने देशावर हल्ला केला आणि मनाहेमने त्याचा पाठिंबा मिळावा आणि आपले राज्य स्थिर व्हावे यासाठी त्याला चांदीचे हजार तालांत दिले.

  4. मनाहेमाने हा पैसा इस्राएलमधून वसूल केला. अश्शूरच्या राजाला द्यायला प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने पन्नास चांदीचे शेकेल द्यायचे होते. मग अश्शूरचा राजा मागे फिरला आणि देशात राहिला नाही.

  5. इस्राएलचा राजा पेकहच्या कारकिर्दीत अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याने इस्राएलवर स्वारी केली आणि इय्योन, आबेल-बेथ-माकाह, यानोहा, केदेश, हासोर, गिलआद, गालील व नफतालीचा सर्व भाग जिंकला आणि लोकांना कैद करून अश्शूरास नेले.

  6. आहाज राजाने अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसरकडे आपले दूत पाठवून त्याला संदेश दिला, “मी तुमचा दास आणि पुत्र आहे. वर येऊन अरामी राजा आणि इस्राएली राजा यांच्यापासून माझा बचाव करा, ज्यांनी माझ्यावर आक्रमण केले आहे.”

  7. आणि आहाजाने याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्यातील भांडारांतील चांदी आणि सोने घेतले आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या.

  8. अश्शूरच्या राजाने त्याची मागणी ऐकली. त्याने दिमिष्कावर हल्ला केला आणि त्याला ताब्यात घेतले. तेथील लोकांना धरून कीर येथे नेले आणि रसीनलाही ठार मारले.

  9. मग आहाज राजा तिग्लथ-पिलेसर अश्शूरच्या राजाला भेटावयास दिमिष्क येथे गेला. त्याने दिमिष्क येथे एक वेदी पाहिली आणि त्याने, तिचा आकार व आराखडा तयार करून तो उरीयाह याजकाकडे पाठवून दिला.

  10. अश्शूरच्या राजामुळे त्याने शब्बाथ दिवशी वापरल्या जाणाऱ्या याहवेहच्या मंदिरातील द्वारमंडप आणि राजासाठी बाहेरचा दरवाजा काढून टाकला.

  11. अश्शूरचा राजा शल्मनेसरने होशेवर हल्ला करून, त्याला जहागीरदार केले आणि त्याला कर द्यावा लागला.

  12. परंतु अश्शूरच्या राजाला होशे फितूर झाल्याचे कळले, कारण त्याने इजिप्त देशाचा राजा सो याच्याकडे दूत पाठविले होते, आणि राजाला निरोप दिला आणि त्याने अश्शूरच्या राजाला दरवर्षीप्रमाणे कर देण्याचे नाकारले. म्हणून अश्शूरचा राजा शल्मनेसरने त्याला कैद केले आणि त्याला तुरुंगात डांबले.

  13. आता अश्शूरच्या राजाने संपूर्ण देशावर आक्रमण केले आणि शोमरोनवर चालून गेला आणि तीन वर्षे त्याला वेढा घातला.

  14. होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले.

  15. जोपर्यंत याहवेहने त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले नाही. जी चेतावणी त्यांनी आपल्या सर्व सेवक संदेष्ट्यांद्वारे दिली होती. म्हणून इस्राएली लोकांना त्यांच्या देशातून बंदिवान म्हणून अश्शूरात नेण्यात आले व आजपर्यंत ते तिथेच आहे.

  16. मग अश्शूरच्या राजाने बाबेलच्या, कूथाह, अव्वा, हमाथ व सफरवाईम येथील लोकांच्या वसाहती हालवून त्यांना शोमरोनात इस्राएलांच्या जागी वसाहती करावयास लावल्या. त्यांनी शोमरोन ताब्यात घेतला आणि त्या नगरात राहू लागले.

  17. अश्शूरच्या राजाकडे याचा निरोप सांगण्यात आला: “ज्या लोकांना तुम्ही त्यांच्या देशातून हाकलून दिले आणि शोमरोनच्या नगरांत स्थायिक केले त्यांना त्या देशाच्या देवाला काय हवे हे माहीत नाही. त्यांनी त्यांच्यामध्ये सिंहांना पाठविले जे त्यांना ठार मारीत आहेत, कारण देवाला काय हवे हे त्या लोकांना माहीत नाही.”

  18. तेव्हा अश्शूरच्या राजाने हे फर्मान काढले: “शोमरोनामधून बंदिवान करून आणलेल्या याजकांपैकी एका याजकाला तिथे पाठवा, जेणेकरून तो तिथे राहील आणि लोकांना त्या देशातील देवाला काय हवे ते शिकविल.”

  19. आणि याहवेह त्याच्याबरोबर होते; त्याने जे काही हाती घेतले त्यात तो यशस्वी झाला. त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंड पुकारले आणि त्याची सेवा केली नाही.

  20. हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चवथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा एलाहचा पुत्र होशेच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, अश्शूरच्या शल्मनेसर राजाने शोमरोनवर आक्रमण केले आणि त्याला वेढा घातला.

  21. मग अश्शूरच्या राजाने इस्राएली लोकांना अश्शूरमध्ये नेले व त्यांना हलह येथे, गोजानातील हाबोर नदीकिनारी व मेदिया लोकांच्या नगरात ठेवले.

  22. हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या नगरांवर हल्ला केला आणि ती ताब्यात घेतली

  23. म्हणून यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने लाखीश येथे अश्शूरच्या राजाला हा संदेश पाठविला: “माझ्याकडून चूक झाली आहे. माझ्यापासून परत जा, आणि तुम्ही जी काही खंडणी मागाल ती मी देईल.” अश्शूरच्या राजाने तडजोडीसाठी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहकडून चांदीचे तीनशे तालांत आणि सोन्याचे तीस तालांत यांची मागणी केली.

  24. यावेळी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिराची दारे व खांबावर मढविलेले सोने काढले व ते अश्शूरच्या राजाला दिले.

  25. अश्शूरच्या राजाने आपला सेनाप्रमुख, त्याचा प्रमुख अधिकारी आणि त्याचा सरसेनापतीसह मोठ्या सैन्यास लाखीशहून यरुशलेमला हिज्कीयाह राजाकडे पाठविले. ते यरुशलेमजवळ आले आणि वरच्या हौदाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या मार्गात उभे राहिले.