मुख्य मजकुरावर जा

Tilgathpilneser

6 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Pul, Jareb, Tilgath-pilneser

"Tilgathpilneser" साठी शोधा

Tilgathpilneser चा उल्लेख असलेली वचने

  1. तेव्हा अश्शूरचा राजा पूल ने देशावर हल्ला केला आणि मनाहेमने त्याचा पाठिंबा मिळावा आणि आपले राज्य स्थिर व्हावे यासाठी त्याला चांदीचे हजार तालांत दिले.

  2. बालाचा पुत्र बैरा रऊबेन वंशाचा सरदार असून त्याला अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर ने कैद करून नेले.

  3. यास्तव इस्राएलाच्या परमेश्वराने अश्शूरचा राजा पूल (म्हणजे अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर), यास तयार केले. त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या वंशाच्या लोकांचा पाडाव करून त्यांना हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत नेऊन बंदिवासात ठेवले व तिथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत.

  4. अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर त्याच्याकडे आला, परंतु त्याने त्याला मदत करण्याऐवजी त्याला त्रास दिला.

  5. “ज्यावेळी एफ्राईमने त्याचा आजार पाहिला, आणि यहूदाहने त्याची जखम पाहिली, तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे वळला, आणि महान राजाकडे मदतीसाठी विनंती केली. परंतु तो तुला बरे करू शकत नाही, तुझ्या जखमाही बर्‍या करू शकत नाही.

  6. महान राजाला भेट म्हणून सादर करण्यासाठी ते अश्शूरला नेले जातील. एफ्राईमला लज्जित केले जाईल; बाहेरील लोकांशी संबंध ठेवल्यामुळे इस्राएलही आपल्या मसलतीविषयी लज्जित होईल.