Skip to content

Rabshakeh

16 वचने

Rabshakeh चा उल्लेख असलेली वचने

  1. अश्शूरच्या राजाने आपला सेनाप्रमुख, त्याचा प्रमुख अधिकारी आणि त्याचा सरसेनापतीसह मोठ्या सैन्यास लाखीशहून यरुशलेमला हिज्कीयाह राजाकडे पाठविले. ते यरुशलेमजवळ आले आणि वरच्या हौदाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या मार्गात उभे राहिले.

  2. तेव्हा सेनाप्रमुख त्यांना म्हणाला, “हिज्कीयाहला सांगा: “ ‘महान राजा, अश्शूरचा राजा असे म्हणतो: तुझा हा भरवसा तू कशावर ठेवला आहेस?

  3. तेव्हा हिल्कियाहचा पुत्र एल्याकीम, शेबना आणि योवाह हे सेनापतीला म्हणाले, “कृपया तुमच्या सेवकांशी अरामी भाषेत बोला, कारण आम्हाला ती समजते. भिंतीवर असलेले लोक ऐकत असताना आमच्याबरोबर यहूदीयाच्या हिब्रू भाषेत बोलू नका.”

  4. परंतु सेनापतीने उत्तर दिले, “माझ्या धन्याने मला या गोष्टी सांगावयास पाठविले होते, ते काय फक्त तुमच्या धन्याला आणि तुम्हाला सांगण्यासाठी आणि भिंतीवर बसलेल्या लोकांसाठी नाही काय; ज्यांना तुमच्यासारखीच स्वतःचीच विष्ठा खावी लागेल आणि स्वतःचेच मूत्र प्यावे लागेल?”

  5. मग सेनाप्रमुख उभा राहिला आणि यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “महान राजा, अश्शूरच्या राजाचे ऐका!

  6. यानंतर हिल्कियाहचा पुत्र राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले.

  7. कदाचित याहवेह तुमचे परमेश्वर सेनाप्रमुखाचे सर्व शब्द ऐकतील, त्याचा स्वामी अश्शूरच्या राजाने आपल्या जिवंत परमेश्वराची निंदा करण्यास पाठविले आहे आणि हे शब्द ऐकून याहवेह तुमचे परमेश्वर त्याचा निषेध करतील. म्हणून जे थोडके उरलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”

  8. जेव्हा सेनाप्रमुखाने ऐकले की अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले आहे, तेव्हा त्याने आपला तळ उठविला आणि राजा लिब्नाह येथे युद्ध करताना त्याला आढळला.

  9. अश्शूरच्या राजाने आपल्या मोठ्या सैन्यासह सरसेनापतीला लाखीशहून हिज्कीयाह राजाकडे यरुशलेमला पाठविले. जेव्हा सेनापती वरच्या हौदाच्या पाटाजवळ रस्त्याच्या कडेला थांबला

  10. तेव्हा सेनाप्रमुख त्यांना म्हणाला, “हिज्कीयाहला सांगा: “ ‘महान राजा, अश्शूरचा राजा असे म्हणतो: तुझा हा भरवसा तू कशावर ठेवला आहेस?

  11. तेव्हा एल्याकीम, शेबना आणि योवाह सेनापतीला म्हणाले, “कृपया तुमच्या सेवकांशी अरामी भाषेत बोला, कारण आम्हाला ती समजते. भिंतीवर असलेले लोक ऐकत असताना आमच्याबरोबर यहूदीयाच्या हिब्रू भाषेत बोलू नका.”

  12. परंतु सेनापतीने उत्तर दिले, “माझ्या धन्याने मला या गोष्टी सांगायला पाठवले होते, ते काय फक्त तुझ्या धन्याला आणि तुला सांगण्यासाठी आणि भिंतीवर बसलेल्या लोकांसाठी नाही काय; ज्यांना तुझ्यासारखेच त्यांची स्वतःचीच विष्ठा खावी लागेल आणि स्वतःचेच मूत्र प्यावे लागेल?”

  13. मग सेनाप्रमुख उभा राहिला आणि यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “महान राजा, अश्शूरचे महाराज यांचे ऐका!

  14. यानंतर हिल्कियाहचा पुत्र, राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले.

  15. कदाचित याहवेह तुमचे परमेश्वर सेनाप्रमुखाचे शब्द ऐकतील, त्याचा स्वामी अश्शूरच्या राजाने आपल्या जिवंत परमेश्वराची निंदा करण्यास पाठविले आहे आणि हे शब्द ऐकून याहवेह तुमचे परमेश्वर त्याचा निषेध करतील. म्हणून जे थोडके उरलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”

  16. जेव्हा सेनाप्रमुखाने ऐकले की अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले आहे, तेव्हा त्याने आपला तळ उठविला आणि राजा लिब्नाह येथे युद्ध करताना त्याला आढळला.