Libnah
31.5600, 34.8400 गूगल नकाशावर पाहा
Libnah चा उल्लेख असलेली वचने
नंतर यहोशुआ व त्याच्याबरोबर सर्व इस्राएली लोक मक्केदाहून लिब्नाह शहरावर चालून गेले आणि त्याच्यावर हल्ला केला.
मग यहोशुआसह संपूर्ण इस्राएल लिब्नाहहून लाखीशला गेले; ते त्या शहराशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाले व त्यांच्यावर हल्ला केला.
याहवेहने लाखीश शहर इस्राएलच्या हाती दिले आणि यहोशुआने दुसर्या दिवशी त्यांच्यावर ताबा मिळविला. लिब्नाहचा केला तसाच लाखीश शहर व त्यात असलेल्या सर्वांचा त्यांनी तलवारीने नाश केला.
त्यांनी ते शहर, त्याचा राजा व त्यातील गावे हस्तगत केली व त्यांना तलवारीने मारून टाकले. त्यातील प्रत्येकाचा समूळ नाश केला. त्यांनी एकही व्यक्ती जिवंत सोडली नाही. आणि लिब्नाह व त्याच्या राजाला व हेब्रोनला केले तसे त्यांनी दबीर व त्याच्या राजालाही केले.
लिब्नाहचा राजा-एक, अदुल्लामचा राजा-एक,
लिब्नाह, एथेर, आशान,
म्हणून अहरोन याजकाच्या वंशजांना त्यांनी हेब्रोन (हत्या केलेल्या व्यक्तीसाठी एक आश्रयाचे शहर), लिब्नाह,
तेव्हापासून आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहनेही बंड केले.
जेव्हा सेनाप्रमुखाने ऐकले की अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले आहे, तेव्हा त्याने आपला तळ उठविला आणि राजा लिब्नाह येथे युद्ध करताना त्याला आढळला.
वयाच्या तेविसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले, त्याच्या आईचे नाव हमूटल असे होते; ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.
सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल असून ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.
अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ,
आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहने बंड केले, कारण यहोरामने त्याच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा त्याग केला होता.
जेव्हा सेनाप्रमुखाने ऐकले की अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले आहे, तेव्हा त्याने आपला तळ उठविला आणि राजा लिब्नाह येथे युद्ध करताना त्याला आढळला.
सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल असून ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.