मुख्य मजकुरावर जा

Assyria

115 verses · 5 known names

हे नावानेही ओळखले जाते: Asshur, Assur, Assyrian, Assyrians

36.3500, 43.1500 गूगल नकाशावर पाहा

Assyria चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अश्शूरला पाहा, लबानोनमधील एक गंधसरू असलेला, ज्याच्या सुंदर फांद्या जंगलास झाकून देत असत; तो सर्वात उंच वाढून, त्याचा शेंडा दाट झाडींच्या वर जातो.

  2. “ज्यावेळी एफ्राईमने त्याचा आजार पाहिला, आणि यहूदाहने त्याची जखम पाहिली, तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे वळला, आणि महान राजाकडे मदतीसाठी विनंती केली. परंतु तो तुला बरे करू शकत नाही, तुझ्या जखमाही बर्‍या करू शकत नाही.

  3. “एफ्राईम एखाद्या खुळ्या पारव्यासारखा बुद्धिहीन आणि सहज फसणारा आहे— तो आता इजिप्तला हाक मारतो; आता तो अश्शूराकडे धाव घेतो.

  4. एकाकी भटकणार्‍या रानगाढवासारखे ते वर अश्शूराकडे गेले आहे. एफ्राईमने स्वतःस तिच्या प्रियकरांना विकले आहे.

  5. याहवेहच्या देशात ते राहणार नाहीत; एफ्राईम इजिप्त देशात परत जाईल आणि अश्शूर येथे अशुद्ध भोजन खाईल.

  6. महान राजाला भेट म्हणून सादर करण्यासाठी ते अश्शूरला नेले जातील. एफ्राईमला लज्जित केले जाईल; बाहेरील लोकांशी संबंध ठेवल्यामुळे इस्राएलही आपल्या मसलतीविषयी लज्जित होईल.

  7. “ते इजिप्त देशात परत जाणार नाहीत काय आणि अश्शूर त्यांच्यावर राज्य करणार नाही काय कारण ते पश्चात्ताप करण्यास नकार देतात?

  8. पक्ष्यांच्या थरथरणाऱ्या थव्याप्रमाणे ते इजिप्तकडून येतील, पारव्यांप्रमाणे पंख फडफडत अश्शूरहून येतील. आणि मी त्यांना त्यांच्या घरी स्थायिक करेन,” असे याहवेह घोषणा करतात.

  9. एफ्राईम वाऱ्यावर चरतो; तो दिवसभर पूर्वेकडील वाऱ्याचा पाठलाग करतो आणि खोटेपणा व हिंसाचार वाढवितो. तो अश्शूरसोबत करार करतो आणि इजिप्तला जैतून तेल पाठवितो.

  10. अश्शूर देशावर तलवारीने, निम्रोदाच्या देशावर उपसलेल्या तलवारीने कोण शासन करेल. अश्शूरचे लोक जेव्हा आपल्या देशावर आक्रमण करतील आणि आपली सीमा ओलांडतील तेव्हा याहवेह आपल्याला त्यांच्यापासून सोडवतील.

  11. अश्शूरपासून इजिप्तच्या नगरांपर्यंत आणि मिसरपासून फरात नदीपर्यंत, समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि डोंगरांपासून डोंगरांपर्यंत, त्या दिवशी लोक तुझ्याकडे येतील.

  12. हे अश्शूरच्या राजा, तुझे मेंढपाळ डुलकी घेतात; तुझे प्रतिष्ठित लोक विश्रांती घेण्यासाठी पहुडले आहेत. तुझे लोक डोंगरांवर विखुरले आहेत त्यांना एकत्र करण्यास कोणीही नाही.

  13. ते उत्तरेविरुद्ध आपला हात उगारतील आणि अश्शूरचा नाश करतील, निनवेह नगरीस ते पूर्णपणे ओसाड आणि वाळवंटाप्रमाणे शुष्क ठिकाण करतील.

  14. मी त्यांना इजिप्तमधून परत आणेन, आणि अश्शूरातून एकत्र गोळा करेन. गिलआद व लबानोनमध्ये त्यांचे पुनर्वसन करेन, आणि तिथे त्यांना जागा पुरेशी होणार नाही.

  15. ते संकटांच्या समुद्रातून प्रवास करतील; उफाळणाऱ्या लाटा शांत केल्या जातील आणि नाईल नदीचे खोल पाणी शुष्क होईल. अश्शूरचा गर्व खाली करण्यात येईल व इजिप्तचा राजदंड निघून जाईल.