मुख्य मजकुरावर जा

Ethiopia बद्दल बायबलमधील वचने: Eunuch from, becomes a disciple under the preaching of Philip

13 वचने · 15 पैलू

Eunuch from, becomes a disciple under the preaching of Philip बद्दल वचने

  1. तेव्हा तो निघाला आणि जात असताना रस्त्यावर त्याला इथिओपिया देशाचा एक षंढ भेटला, हा षंढ इथिओपियाची राणी कांदकेचा महत्त्वाचा अधिकारी व खजिनदार होता. हा मनुष्य यरुशलेमला आराधना करण्यासाठी आला होता,

  2. आणि आता घरी परत जात असताना तो त्याच्या रथामध्ये बसून यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता.

  3. तेव्हा पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “तू रथ गाठ आणि त्याच्या जवळच चालत राहा.”

  4. मग फिलिप्प धावत रथापर्यंत गेला आणि तो खोजा यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. ते ऐकून त्याने त्याला विचारले, “आपण जे वाचत आहात ते आपणास समजते काय?”

  5. तो म्हणाला, “कोणीतरी स्पष्टीकरण करून सांगितल्याशिवाय हे मला कसे समजेल?” म्हणून त्याने फिलिप्पाला विनंती केली की, त्याने रथात चढून त्याच्याजवळ बसावे.

  6. शास्त्रलेखातील जो उतारा तो षंढ वाचीत होता तो असा होता: “वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.

  7. त्याच्या लीन अवस्थेत तो न्यायापासून वंचित राहिला. त्याच्या वंशजांबद्दल कोण बोलू शकेल? कारण त्याचे जीवन पृथ्वीवरून काढून घेण्यात आले होते.”

  8. षंढाने फिलिप्पाला विचारले, “संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे, स्वतःविषयी किंवा दुसर्‍या कोणाविषयी?”

  9. तेव्हा फिलिप्पाने त्याच शास्त्रलेखापासून सुरुवात करून त्याला येशूंची शुभवार्ता सांगितली.

  10. तसेच पुढे प्रवास करीत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका जलाशयाजवळ ते आले आणि त्याचवेळेस षंढ म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे. माझा बाप्तिस्मा होण्यासाठी काही अडचण आहे काय?”

  11. फिलिप्पाने उत्तर दिले, “आपण पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरीत असाल, तर आपला बाप्तिस्मा होऊ शकतो.” आणि षंढाने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा मी विश्वास ठेवतो.”

  12. मग त्याने रथ थांबविण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ दोघेही खाली पाण्यात उतरले आणि फिलिप्पाने त्याला बाप्तिस्मा दिला.

  13. ते पाण्यातून वर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने एकाएकी फिलिप्पाला उचलून नेले आणि त्या षंढाला तो पुन्हा कधीही दिसला नाही. तो आनंद करीत त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला.