मुख्य मजकुरावर जा

Ethiopia बद्दल बायबलमधील वचने: Desolation of

17 वचने · 15 पैलू

"Ethiopia" साठी शोधा

Desolation of बद्दल वचने

  1. कूशच्या नद्यांच्या काठावर असलेल्या देशांचा, जिथून पंखांचा फडफड आवाज येतो त्यास धिक्कार असो.

  2. जो समुद्रमार्गाने पाण्यावरून पापिरस नौकांमधून दूतांना पाठवितो. जा, जलदगतीने जाणाऱ्या दूतांनो, धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडे जा, त्यांची जबर असलेल्या दूरवरच्या लोकांकडे, विक्षिप्त भाषण करणारे आक्रमक राष्ट्र, ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे.

  3. अहो तुम्ही जगातील सर्व लोकहो, तुम्ही जे पृथ्वीवर राहता, जेव्हा पर्वतांवर झेंडा उभारला जाईल, तेव्हा तुम्हाला तो दिसेल, आणि जेव्हा तुतारी वाजेल तेव्हा तुम्ही ती ऐकाल.

  4. याहवेह मला असे म्हणतात: “मी शांत राहीन आणि माझ्या निवासस्थानातून पाहीन, सूर्यप्रकाशामध्ये चमकणाऱ्या उष्णतेसारखे, दव असलेले ढग कापणीच्या उन्हात असल्यासारखे.”

  5. कारण, कापणीच्या आधी, जेव्हा फुलोरा संपेल आणि फुले पिकलेले द्राक्ष होतात, ते छाटणीच्या सुऱ्यांनी फुटलेले कोंब कापून टाकतील, आणि पसरत असलेल्या फांद्या कापून टाकतील आणि काढून टाकतील.

  6. डोंगरावरील हिंस्र पक्ष्यांसाठी आणि वन्यप्राण्यांसाठी, भक्ष्य म्हणून त्या सर्वांना तिथेच सोडले जाईल; संपूर्ण उन्हाळ्यात पक्षी त्यांचे भक्षण करतील, आणि संपूर्ण हिवाळ्यात वन्यप्राणी त्यांचे भक्षण करतील.

  7. त्यावेळेस आमोजचा पुत्र यशायाहद्वारे याहवेह बोलले. ते त्याला म्हणाले, “तुझ्या अंगावरील गोणपाट आणि पायातील चपला काढून टाक.” आणि त्याने तसे केले, वस्त्रहीन आणि अनवाणी असा तो फिरत राहिला.

  8. तेव्हा याहवेह म्हणाले, “जसा माझा सेवक यशायाह तीन वर्षे विवस्त्र आणि अनवाणी चालला, त्याचप्रमाणे इजिप्त व कूश यांच्याविरुद्ध हे चिन्ह आणि अरिष्टसूचक गोष्ट असेल,

  9. म्हणून अश्शूरचा राजा इजिप्तच्या बंदिवानांना आणि कूशच्या बंदिवानांना, तरुणांना आणि वृद्धांना उघडे ठेवलेले नितंब आणि अनवाणी असे—इजिप्तला लज्जित म्हणून चालवेल.

  10. ज्यांनी कूशवर विश्वास ठेवला आणि इजिप्तबद्दल बढाई मारली ते निराश होतील आणि लज्जित होतील.

  11. त्या दिवशी या किनार्‍यावर राहणारे लोक असे म्हणतील की, ‘ज्यांच्यावर आम्ही विसंबून होतो, पहा हे त्यांचे काय झाले आहे. ज्यांच्याकडे आम्ही मदतीसाठी आणि अश्शूरच्या राजापासून आमची सुटका व्हावी यासाठी धाव घेतली होती, तर आता आमची सुटका कशी होईल?’ ”

  12. इजिप्तविरुद्ध एक तलवार येईल आणि कूशवर वेदना येतील. जेव्हा वधलेले इजिप्तमध्ये पडतील, तिची संपत्ती काढून घेतली जाईल आणि तिचे पाये मोडून टाकले जातील.

  13. कूश आणि लिबिया, लूद व संपूर्ण अरब, कूब आणि कराराच्या देशाचे लोक इजिप्तबरोबर तलवारीने पडतील.

  14. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘इजिप्तचे मित्रगण पडतील तिचे अहंकारी बळ सुद्धा पडेल. मिग्दोलपासून असवानपर्यंत सर्व तिच्यामध्ये तलवारीने पडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  15. सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये, ते ओसाड पडतील, आणि त्यांची शहरे उद्ध्वस्त झालेल्या शहरांमध्ये पडतील.

  16. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे, मी जेव्हा इजिप्तला आग लावेन, तेव्हा तिला मदत करणार्‍यांचाही चुरा होईल.

  17. “ ‘त्या दिवशी त्या कूशी लोकांना घाबरवून त्यांच्या निश्चिंतेतून बाहेर काढावे म्हणून माझ्याकडून जहाजामध्ये संदेष्टे जातील. इजिप्तच्या नाशाच्या दिवशी वेदना त्यांचा ताबा घेईल, कारण तो दिवस खचितच येत आहे.