Skip to content

Asa

53 वचने · 3 कुटुंब सदस्य

Asa चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग अबीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या शहरात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र आसा राजा म्हणून त्याचा वारस झाला.

  2. इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी आसा यहूदीयाचा राजा झाला,

  3. आसाने आपला पूर्वज दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

  4. त्याने आपली आजी माकाह हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकले, कारण तिने तिरस्करणीय अशी अशेराची उपासना करण्यासाठी एक मूर्ती घडविली होती. आसाने ती तोडली व किद्रोनच्या खोऱ्याजवळ जाळून टाकली,

  5. जरी त्याने पूजास्थाने मोडून टाकली नाही, तरीही आसाचे हृदय त्याच्या जीवनभरात याहवेहशी समर्पित होते.

  6. यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले.

  7. यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशाने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली.

  8. त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील भांडारात उरलेले सर्व चांदी व सोने काढून घेतले व ते आपल्या सरदारांच्या हाती स्वाधीन करून त्यांना हेजीओनचा पुत्र ताब्रिम्मनचा पुत्र बेन-हदाद, अरामचा राजा जो दिमिष्कात राज्य करीत होता त्याच्याकडे पाठवले.

  9. बेन-हदद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठविले. त्याने इय्योन, दान, आबेल-बेथ-माकाह आणि नफतालीसहीत संपूर्ण किन्नेरेथवर विजय मिळविला.

  10. मग आसा राजाने सर्व यहूदीयात एक हुकूम जाहीर केला; त्यातून कोणीही वगळले नाही; आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने बिन्यामीनातील गेबा आणि मिस्पाह हे बांधले.

  11. आसाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याचे सर्व पराक्रम, जे सर्वकाही त्याने केले व जी शहरे त्याने बांधली, ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? पण त्याच्या वृद्धापकाळात तो पायाच्या आजाराने त्रस्त झाला.

  12. मग आसा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरला गेला. आणि त्याचा पुत्र यहोशाफाट राजा म्हणून त्याचा वारस झाला.

  13. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यरोबोअमचा पुत्र नादाब इस्राएलचा राजा झाला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले.

  14. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाशाने नादाबला ठार केले व तो स्वतः त्याच्या जागी राजा झाला.

  15. यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले.

  16. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी अहीयाहचा पुत्र बाशा हा तिरजाह येथे इस्राएलचा राजा झाला. त्याने चोवीस वर्षे राज्य केले.

  17. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सव्विसाव्या वर्षी, बाशाचा पुत्र एलाह तिरजाह येथे इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले.

  18. तेव्हा जिम्री आत आला व त्याच्यावर वार करून त्याला मारून टाकले आणि त्याचा उत्तराधिकारी म्हणून राजा झाला. यहूदीयाचा राजा आसाच्या सत्ताविसाव्या वर्षी असे झाले.

  19. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी जिम्रीने तिरजाह येथे इस्राएलवर सात दिवस राज्य केले. सैन्याने पलिष्ट्यांच्या हद्दीतील गिब्बथोन नगराजवळ छावणी दिली होती.

  20. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या एकतिसाव्या वर्षी ओमरी इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने बारा वर्षे राज्य केले, त्यापैकी सहा वर्षे तिरजाह येथे राज्य केले.

  21. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी ओमरीचा पुत्र अहाब इस्राएलवर राज्य करू लागला. त्याने शोमरोन येथे इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले.

  22. इस्राएलचा राजा अहाबाच्या चौथ्या वर्षी आसाचा पुत्र यहोशाफाट यहूदीयाचा राजा झाला.

  23. त्याने आपला पिता आसाचे सर्व मार्गात अनुसरण केले आणि त्यापासून तो वळला नाही; याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नव्हती आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.

  24. त्याचा पिता आसाच्या कारकिर्दीच्या नंतरही चालू असलेली मंदिरातील पुरुषगामी यातून त्याने देशाला मुक्त केले.

  25. शलोमोनचा पुत्र रेहोबोअम, त्याचा पुत्र अबीयाह, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट,