Tirzah
32.2700, 35.2900 गूगल नकाशावर पाहा
Tirzah चा उल्लेख असलेली वचने
तिरजाहचा राजा-एक,
तेव्हा यरोबोअमची पत्नी तिथून उठून तिरजाह येथे गेली. तिने उंबरठ्यावर पाऊल टाकताच, तिचा मुलगा मेला.
बाशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा रामाह बांधण्याचे थांबवून तिरजाह येथे राहिला.
यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी अहीयाहचा पुत्र बाशा हा तिरजाह येथे इस्राएलचा राजा झाला. त्याने चोवीस वर्षे राज्य केले.
बाशा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला तिरजाह येथे पुरले गेले. त्याचा पुत्र एलाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.
यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सव्विसाव्या वर्षी, बाशाचा पुत्र एलाह तिरजाह येथे इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले.
जिम्री, जो त्याच्या अधिकार्यांपैकी एक होता, जो त्याच्या निम्म्या रथांचा सेनापती होता, त्याने त्याच्याविरुद्ध कट रचला. एलाह त्यावेळी तिरजाह येथे, राजवाड्याचा अधिकारी अरजाच्या तिरजाह येथील घरी मद्यधुंद झाला होता.
यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी जिम्रीने तिरजाह येथे इस्राएलवर सात दिवस राज्य केले. सैन्याने पलिष्ट्यांच्या हद्दीतील गिब्बथोन नगराजवळ छावणी दिली होती.
तेव्हा ओमरी व त्याच्या बरोबरच्या इस्राएली लोकांनी गिब्बथोन सोडून तिरजाह नगराला वेढा दिला.
यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या एकतिसाव्या वर्षी ओमरी इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने बारा वर्षे राज्य केले, त्यापैकी सहा वर्षे तिरजाह येथे राज्य केले.
नंतर गादीचा पुत्र मनाहेम हा तिरजाहवरून शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा पुत्र शल्लूमास ठार मारले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.
त्यावेळी, तिरजाहपासून निघालेल्या मनाहेमाने तिफसाह आणि शहरातील आणि सीमेच्या क्षेत्रातील सर्वांवर हल्ला केला, कारण त्यांनी आपली वेस उघडण्यास नकार दिला. त्याने त्यांना मार दिला आणि सर्व गरोदर महिलांना चिरून टाकले.
माझ्या प्रिये, तू तिरजाह नगरीसारखी सुंदर आहेस, जसे यरुशलेम मनोहर आहे, जसे ध्वज फडकविणारे विजयी सैन्य तशी तू ऐश्वर्यशाली आहे.