Skip to content

Regicide बद्दल बायबलमधील वचने

33 वचने · 14 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आता एहूदाने दुधारी तलवार बनविली, जी अर्धा मीटर लांब होती, ती त्याने त्याच्या झग्याखाली उजव्या मांडीवर बांधली.

  2. त्याने मोआबच्या राजा एग्लोनाच्या समोर रसद सादर केली, जो खूप गलेलठ्ठ मनुष्य होता.

  3. एहूदाने रसद सादर केल्यानंतर, ज्यांनी ते वाहून नेले होते त्यांना त्यांच्या मार्गावर परत पाठविले.

  4. परंतु गिलगालजवळील दगडी मूर्तीजवळ पोहोचल्यावर तो स्वतः एग्लोनकडे परत गेला आणि म्हणाला, “महाराज, माझ्याकडे तुमच्यासाठी एक गुप्त संदेश आहे.” राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आम्हाला एकटे सोडा!” आणि ते सर्व निघून गेले.

  5. मग त्याच्या राजवाड्याच्या वरच्या खोलीत तो एकटाच बसला असताना एहूद त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी माझ्याकडे परमेश्वराचा संदेश आहे.” राजा आसनावरून उठताच,

  6. एहूदाने आपला डावा हात पुढे झग्याखाली करून उजव्या मांडीवर बांधलेली तलवार उपसली आणि राजाच्या पोटात खोल खुपसली.

  7. पात्याबरोबर मूठही आत गेली आणि आतडी बाहेर पडली, एहूदाने ती तलवार बाहेर काढली नाही, तलवारीवर चरबी गोळा झाली होती.

  8. मग एहूद बाहेर ओसरीत गेला; त्याने त्याच्यामागे वरच्या खोलीचे दरवाजे बंद केले आणि त्यांना कुलूप लावले.

  9. कारण दावीद त्याला म्हणाला होता, “तुझ्या रक्ताचा दोष तुझ्याच डोक्यावर असो. जेव्हा तू असे म्हणालास की, ‘मी याहवेहच्या अभिषिक्ताला ठार मारले आहे,’ तुझ्या स्वतःच्या तोंडाने स्वतःविरुद्ध साक्ष दिली आहे.”

  10. आता बैरोथ येथील रिम्मोनचे पुत्र रेखाब आणि बाअनाह हे प्रवासाला निघाले आणि इश-बोशेथ मध्यानाच्या वेळी, दुपारची विश्रांती घेत होता, तेव्हा हे त्याच्या घरी आले.

  11. गहू घेत आहेत असे दाखवित ते घराच्या आतील भागात गेले आणि त्यांनी त्याच्या पोटावर वार केला. नंतर रेखाब आणि त्याचा भाऊ बाअनाह तिथून निसटून गेले.

  12. ते जेव्हा घरामध्ये गेले होते त्यावेळेस तो त्याच्या झोपण्याच्या खोलीत पलंगावर विश्रांती घेत होता. तेव्हा त्यांनी त्याच्यावर वार करून त्याला जिवे मारले, त्यांनी त्याचे डोके कापले व ते घेऊन रात्रभर अराबाहच्या मार्गाने प्रवास करीत गेले.

  13. त्यांनी इश-बोशेथचे डोके हेब्रोनात दावीदाकडे आणले आणि राजाला म्हणाले, “हे पाहा, तुमचा शत्रू शौल ज्याने तुम्हाला जिवे मारावयास पाहिले, त्याचा पुत्र इश-बोशेथ याचे शिर. आज याहवेहने माझ्या धनीराजाच्या विरुद्ध शौल आणि त्याच्या संतानाचा सूड घेतला आहे.”

  14. इस्साखार गोत्रातील अहीयाहचा पुत्र बाशाने नादाबाविरुद्ध कट केला, नादाब व सर्व इस्राएली लोकांनी गिब्बथोनला वेढा घातला असता, त्याने त्याला पलिष्ट्यांच्या गिब्बथोन नगरात मारून टाकले.

  15. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाशाने नादाबला ठार केले व तो स्वतः त्याच्या जागी राजा झाला.

  16. त्याच्या राज्याच्या सुरुवातीलाच, त्याने यरोबोअमच्या संपूर्ण घराण्याला मारून टाकले, याहवेहचा सेवक शिलोनी अहीयाहच्या वचनानुसार त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही, सर्वांचा नाश केला.

  17. जिम्री, जो त्याच्या अधिकार्‍यांपैकी एक होता, जो त्याच्या निम्म्या रथांचा सेनापती होता, त्याने त्याच्याविरुद्ध कट रचला. एलाह त्यावेळी तिरजाह येथे, राजवाड्याचा अधिकारी अरजाच्या तिरजाह येथील घरी मद्यधुंद झाला होता.

  18. तेव्हा जिम्री आत आला व त्याच्यावर वार करून त्याला मारून टाकले आणि त्याचा उत्तराधिकारी म्हणून राजा झाला. यहूदीयाचा राजा आसाच्या सत्ताविसाव्या वर्षी असे झाले.

  19. तो राजा झाला व राजासनावर बसताच, त्याने बाशाच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकले. कोणीही पुरुष, नातेवाईक किंवा मित्र त्याने जिवंत सोडला नाही.

  20. येहूने आपला धनुष्य सर्व शक्तिनिशी ओढला आणि यहोरामाच्या दोन्ही बाहूंच्यामध्ये मारला. बाण त्याच्या हृदयात शिरला, आणि तो रथातच कोसळून पडला.

  21. काय झाले ते पाहून, जेव्हा यहूदीयाचा राजा अहज्याह बेथ-हागानकडे जाणार्‍या मार्गाने पळाला. येहू त्याचा पाठलाग करता करता ओरडून म्हणाला, “त्यालाही मारा!” मग त्यांनी त्याला इब्लामजवळच्या गुर येथील चढणीवर रथातच घायाळ केले; तो मगिद्दोपर्यंत पळाला आणि तिथे तो मरण पावला.

  22. योआशाच्या अधिकार्‍यांनीच त्याच्याविरुद्ध कट रचला आणि सिल्लाकडे खाली जाणार्‍या रस्त्यावर बेथ मिल्लो येथे त्याचा वध केला.

  23. ज्या अधिकार्‍यांनी त्याचा वध केला ते शिमाथाचा पुत्र योजाखार व शोमेराचा पुत्र यहोजाबाद हे होते. तो मरण पावला आणि त्याला दावीदनगरीत पूर्वजांच्या सोबत मूठमाती देण्यात आली. त्याचा पुत्र अमस्याह हा त्याच्या जागी राजा झाला.

  24. त्यांनी यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचला आणि तो लाखीशकडे पळून गेला, परंतु त्यांनी त्याच्यामागे लाखीशकडे माणसे पाठवून दिली आणि त्याला तिथे मारले.

  25. त्याला घोड्यावरून परत आणण्यात आले आणि यरुशलेममध्ये दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांबरोबर पुरण्यात आले.