Skip to content

Regicide बद्दल बायबलमधील वचने

33 वचने · 14 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याबेशाचा पुत्र शल्लूमाने जखर्‍याहविरुद्ध कट रचला. त्याने लोकांसमोर त्याच्यावर हल्ला करून ठार त्याला केले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.

  2. नंतर गादीचा पुत्र मनाहेम हा तिरजाहवरून शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा पुत्र शल्लूमास ठार मारले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.

  3. त्याचा एक मुख्य अधिकारी, रमाल्याहचा पुत्र पेकहने त्याच्याविरुद्ध कट रचला. गिलआदी लोकांपैकी पन्नास लोकांना बरोबर घेऊन त्याने पेकाहियाहला, अर्गोब आणि अरये यांच्यासह शोमरोन येथील राजवाड्याच्या वाड्यात मारले. पेकहने पेकाहियाहयाचा वध केला आणि त्याच्या जागी राजा झाला.

  4. नंतर एलाहचा पुत्र होशेने रमाल्याहचा पुत्र पेकहाच्या विरुद्ध कट रचला. त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार केले व त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला. ही घटना उज्जीयाहचा पुत्र योथामाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी घडली.

  5. म्हणून अश्शूरचा राजा सन्हेरीबने छावणी उठविली व तो माघारी परतला. तो निनवेहला परत गेला व तिथेच राहिला.

  6. एके दिवशी, तो निस्रोख या त्याच्या दैवताच्या मंदिरात पूजा करीत असताना, त्याचे पुत्र अद्राम्मेलेक व शरेसर यांनी तलवारीने त्याचा वध केला व ते अरारात देशात पळून गेले. नंतर त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र एसरहद्दोन राजा झाला.

  7. म्हणून अश्शूरचा राजा सन्हेरीबने छावणी उठविली व तो माघारी परतला. तो निनवेहला परत गेला व तिथेच राहिला.

  8. एके दिवशी, तो निस्रोख या त्याच्या दैवताच्या मंदिरात पूजा करीत असताना, त्याचे पुत्र अद्राम्मेलेक व शरेसर यांनी तलवारीने त्याचा वध केला व ते अरारात देशात पळून गेले. नंतर त्याचा वारस, त्याचा पुत्र एसरहद्दोन राजा झाला.