Skip to content

Ehud

8 वचने · 6 कुटुंब सदस्य

Ehud चा उल्लेख असलेली वचने

  1. इस्राएलांनी पुन्हा याहवेहचा धावा केला आणि त्यांनी त्यांना एक सोडविणारा—बिन्यामीन गेराचा पुत्र एहूद दिला, जो डाव्या हाताचा मनुष्य होता. इस्राएली लोकांनी त्याला मोआबाचा राजा एग्लोनकडे नजराणा देऊन पाठविले.

  2. आता एहूदाने दुधारी तलवार बनविली, जी अर्धा मीटर लांब होती, ती त्याने त्याच्या झग्याखाली उजव्या मांडीवर बांधली.

  3. मग त्याच्या राजवाड्याच्या वरच्या खोलीत तो एकटाच बसला असताना एहूद त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी माझ्याकडे परमेश्वराचा संदेश आहे.” राजा आसनावरून उठताच,

  4. एहूदाने आपला डावा हात पुढे झग्याखाली करून उजव्या मांडीवर बांधलेली तलवार उपसली आणि राजाच्या पोटात खोल खुपसली.

  5. मग एहूद बाहेर ओसरीत गेला; त्याने त्याच्यामागे वरच्या खोलीचे दरवाजे बंद केले आणि त्यांना कुलूप लावले.

  6. ते तिथे वाट पाहत असता, एहूद पळून गेला. दगडी मूर्तीपलीकडे सेईराह येथे जाऊन पोहोचला.

  7. एहूदच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले.

  8. एहूदाचे पुत्र, जे गेबा येथील कुटुंबाचे प्रमुख होते, ज्यांचा पाडाव करून त्यांना मानाहथ येथे नेले ते: