Skip to content

Baasha बद्दल बायबलमधील वचने

28 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले.

  2. यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशाने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली.

  3. त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील भांडारात उरलेले सर्व चांदी व सोने काढून घेतले व ते आपल्या सरदारांच्या हाती स्वाधीन करून त्यांना हेजीओनचा पुत्र ताब्रिम्मनचा पुत्र बेन-हदाद, अरामचा राजा जो दिमिष्कात राज्य करीत होता त्याच्याकडे पाठवले.

  4. आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोन्याची भेट पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.”

  5. बेन-हदद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठविले. त्याने इय्योन, दान, आबेल-बेथ-माकाह आणि नफतालीसहीत संपूर्ण किन्नेरेथवर विजय मिळविला.

  6. बाशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा रामाह बांधण्याचे थांबवून तिरजाह येथे राहिला.

  7. मग आसा राजाने सर्व यहूदीयात एक हुकूम जाहीर केला; त्यातून कोणीही वगळले नाही; आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने बिन्यामीनातील गेबा आणि मिस्पाह हे बांधले.

  8. इस्साखार गोत्रातील अहीयाहचा पुत्र बाशाने नादाबाविरुद्ध कट केला, नादाब व सर्व इस्राएली लोकांनी गिब्बथोनला वेढा घातला असता, त्याने त्याला पलिष्ट्यांच्या गिब्बथोन नगरात मारून टाकले.

  9. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाशाने नादाबला ठार केले व तो स्वतः त्याच्या जागी राजा झाला.

  10. त्याच्या राज्याच्या सुरुवातीलाच, त्याने यरोबोअमच्या संपूर्ण घराण्याला मारून टाकले, याहवेहचा सेवक शिलोनी अहीयाहच्या वचनानुसार त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही, सर्वांचा नाश केला.

  11. जी पापे यरोबोअमने केली आणि इस्राएली लोकांना देखील करावयाला लावली आणि त्याने याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा राग भडकाविला म्हणून हे सगळे घडले.

  12. नादाबच्या राज्याच्या इतर घटना, आणि जे सर्वकाही त्याने केले ते इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या गेल्या नाहीत काय?

  13. यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले.

  14. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी अहीयाहचा पुत्र बाशा हा तिरजाह येथे इस्राएलचा राजा झाला. त्याने चोवीस वर्षे राज्य केले.

  15. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. त्याने यरोबोअमच्या मार्गाचे अनुसरण करून जी पापे त्याने इस्राएलास करण्यास लावले, तीच पापे बाशानेही केली.

  16. हनानीचा पुत्र येहूकडे बाशासंबंधी याहवेहचे जे वचन आले ते हे:

  17. “मी तुला धुळीतून उचलून माझ्या इस्राएली लोकांवर अधिकारी नेमले, परंतु तू यरोबोअमचा मार्ग अनुसरला आहेस व माझ्या इस्राएली लोकांना पाप करावयाला भाग पाडले आणि त्यांच्या पापामुळे माझा क्रोध भडकविला आहे.

  18. म्हणून मी बाशा व त्याच्या घराण्याला नाहीसे करेन आणि मी तुझ्या घराण्याला नेबाटाचा पुत्र यरोबोअम याच्या घराण्यासारखे करेन.

  19. बाशाच्या मालकीचा जो कोणी शहरात मरेल त्यांना कुत्रे खातील आणि जे शहराच्या बाहेर मरतील त्यांना पक्षी खातील.”

  20. बाशाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेली कृत्ये व त्याची यशप्राप्ती, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही?

  21. बाशा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला तिरजाह येथे पुरले गेले. त्याचा पुत्र एलाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  22. त्याचप्रमाणे, हनानीचा पुत्र येहू संदेष्ट्याच्या द्वारे याहवेहचे जे वचन बाशा व त्याच्या घराण्याकडे आले, कारण त्याने याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले व त्याने केलेल्या कृत्यांमुळे याहवेहचा क्रोध भडकविला, त्यामुळे यरोबोअमच्या घराण्यासारखे त्याचे झाले; आणि त्याचा नाश झाला.

  23. आसाच्या कारकिर्दीच्या छत्तिसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशा याने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली.

  24. त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील खजिन्यातून चांदी व सोने काढून घेतले व ते दिमिष्कात राज्य करणारा बेन-हदाद अरामच्या राजाकडे पाठवले.

  25. आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोने पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.”