Skip to content

Jeroboam

81 वचने · 4 कुटुंब सदस्य

Jeroboam चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेरेदाह येथील एक एफ्राईमकर, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने सुद्धा शलोमोन राजाविरुद्ध बंड केले. त्याची आई विधवा होती, तिचे नाव जेरुआह होते.

  2. यरोबोअम एक शूरवीर होता. या तरुणाने आपले काम किती उत्तम प्रकारे केले आहे, हे शलोमोनने पाहिले, तेव्हा त्याने त्याला योसेफाच्या गोत्रातील सर्व मजूर कामगारांवर मुख्य असे नेमले.

  3. त्याच दरम्यान यरोबोअम यरुशलेमातून बाहेर जात असताना, शिलोनी अहीयाह नावाचा संदेष्टा, नवीन झगा घातलेला असा त्याला वाटेत भेटला. ते त्या मैदानात दोघेच होते,

  4. आणि तो यरोबोअमास म्हणाला, “तुझ्यासाठी दहा तुकडे उचलून घे, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘पाहा, मी शलोमोनच्या हातून राज्य हिसकावून घेईन व दहा गोत्र मी तुझ्या हाती देईन.

  5. शलोमोनने यरोबोअमला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण यरोबोअम इजिप्त देशाचा राजा शिशाककडे पळून गेला आणि शलोमोनचा मृत्यू होईपर्यंत तिथेच राहिला.

  6. जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो शलोमोन राजापासून पळून अजूनही इजिप्त देशातच होता). तो इजिप्तवरून परत आला.

  7. तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि इस्राएलची सर्व मंडळी रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले:

  8. तीन दिवसानंतर यरोबोअम व सर्व लोक रेहोबोअमकडे आले, कारण राजाने त्यांना सांगितले होते, “तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.”

  9. अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे याहवेहने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या.

  10. यरोबोअम इजिप्त देशातून परत आला आहे हे सर्व इस्राएल लोकांनी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला आपल्या मंडळीत बोलावून घेतले व त्याला सर्व इस्राएलवर राजा केले. केवळ यहूदाहचे गोत्र दावीदाच्या घराण्याशी विश्वासू राहिले.

  11. तेव्हा यरोबोअमने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम शहर बांधले व तिथे राहिला. तिथून पुढे त्याने पेनुएल बांधले.

  12. यरोबोअमने स्वतःशी विचार केला, “राज्य कदाचित दावीदाच्या घराण्याकडे परत जाईल.

  13. आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जसा यहूदीयामध्ये पाळला जात असे तसेच त्याने एका सणाची स्थापना केली. आणि वेदीवर यज्ञार्पणे केली. बेथेलमध्ये बनविलेल्या वासरांसाठी अर्पणे त्याने केली. बेथेलमध्ये यरोबोअमने बनविलेल्या पूजास्थानांवर सुद्धा त्याने याजक नेमले.

  14. याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराचा एक मनुष्य यहूदीयावरून बेथेलास आला, जेव्हा यरोबोअम अर्पण करण्यासाठी वेदीजवळ उभा होता.

  15. जेव्हा यरोबोअम राजाने परमेश्वराच्या मनुष्याने बेथेलात वेदीविरुद्ध जे काही सांगितले ते ऐकले, तेव्हा वेदीवरून आपला हात पुढे करून तो म्हणाला, “त्याला पकडा!” परंतु जो हात त्याने पुढे केला होता, तो वाळून गेला आणि त्याला तो मागे घेता येईना.

  16. यानंतरही, यरोबोअमने त्याचे दुष्टमार्ग सोडले नाही व पुन्हा प्रत्येक प्रकारच्या लोकांमधून पूजास्थानांसाठी याजकांची नेमणूक केली. ज्या कोणाला याजक होण्यास इच्छा होईल त्यांना त्याने पूजास्थानांसाठी वेगळे केले.

  17. यरोबोअमचे घराण्याचे हे पाप त्यांच्या पतनास व पृथ्वीवरून त्यांच्या नाशास कारण झाले.

  18. त्या काळात यरोबोअमचा पुत्र अबीयाह आजारी पडला,

  19. आणि यरोबोअम आपल्या पत्नीस म्हणाला, “यरोबोअमची पत्नी म्हणून तुला कोणी ओळखू नये म्हणून आपला वेष पालट. मग शिलोह येथे जा. मी या लोकांचा राजा होईल असे ज्या व्यक्तीने मला सांगितले असा अहीयाह नावाचा संदेष्टा तिथे आहे.

  20. म्हणून यरोबोअमच्या पत्नीने त्याने सांगितल्याप्रमाणे केले व शिलोह येथे अहीयाहच्या घरी गेली. अहीयाह तर आता त्याच्या वयामुळे पाहू शकत नव्हता; त्याची दृष्टी मंद झाली होती.

  21. परंतु याहवेहने अहीयाहला आधी सांगून ठेवले होते, “यरोबोअमची पत्नी तिच्या मुलाबद्दल तुला विचारण्यास येत आहे, कारण तो आजारी आहे आणि तू तिला असे उत्तर द्यावे. जेव्हा ती आत येईल तेव्हा ती कोणी दुसरीच स्त्री असल्याचे ढोंग करेल.”

  22. जेव्हा अहीयाहने दाराजवळ तिच्या पावलांचा आवाज ऐकला, तेव्हा तो म्हणाला, “यरोबोअमचे पत्नी, आत ये. हे सोंग तू का घ्यावे? दुःखाची बातमी घेऊन मला तुझ्याकडे पाठविले गेले आहे.

  23. जा, यरोबोअमला सांग, याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुला लोकांमधून वर काढले आणि माझ्या इस्राएली लोकांवर त्यांचा अधिकारी असे नेमले.

  24. “ ‘यामुळे यरोबोअमच्या घरावर मी अरिष्ट आणणार आहे. मी इस्राएलातून यरोबोअमच्या घराण्याचा प्रत्येक शेवटचा पुरुष नष्ट करेन; मग तो गुलाम असो वा मोकळा असो. यरोबोअमचे घराणे संपूर्णपणे नष्ट होईपर्यंत शेणाप्रमाणे जाळून टाकीन.

  25. यरोबोअमच्या घराण्यातील जे कोणी शहरात मरण पावतील त्यांना कुत्रे खातील आणि जे शहराच्या बाहेर मरतील त्यांना पक्षी खाऊन टाकतील. याहवेहने हे म्हटले आहे!’