मुख्य मजकुरावर जा

Jeroboam

81 वचने · 4 कुटुंब सदस्य

Jeroboam चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सर्व इस्राएली त्याच्यासाठी शोक करून त्याला पुरतील. यरोबोअमच्या घराण्यातील तो एकटाच आहे जो पुरला जाईल, कारण तो एकटाच आहे ज्याच्या ठायी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराला काहीतरी चांगले आढळले आहे.

  2. “याहवेह स्वतःच आपल्यासाठी इस्राएलवर असा राजा उभा करतील जो यरोबोअमच्या कुटुंबाचा उच्छेद करेल. ते आताच घडण्यास सुरुवात होत आहे.

  3. यरोबोअमने जी पापे केली व इस्राएलला सुद्धा करण्यास भाग पाडले यामुळे याहवेह त्यांचा त्याग करतील.”

  4. तेव्हा यरोबोअमची पत्नी तिथून उठून तिरजाह येथे गेली. तिने उंबरठ्यावर पाऊल टाकताच, तिचा मुलगा मेला.

  5. यरोबोअमच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने कसे राज्य केले व कशा लढाया लढल्या हे सर्व इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिले आहे.

  6. यरोबोअमने बावीस वर्षे राज्य केले आणि तो त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. त्याचा पुत्र नादाब त्याचा वारस झाला.

  7. रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले.

  8. नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाह यहूदीयाचा राजा झाला,

  9. अबीयाहच्या जीवनभर यरोबोअम आणि रेहोबोअम यांच्यामध्ये युद्ध होत राहिले.

  10. अबीयाहच्या राज्याच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले ते सर्व यहूदीया देशाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? अबीयाह व यरोबोअम यांच्यातील युद्ध सुरूच होते.

  11. इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी आसा यहूदीयाचा राजा झाला,

  12. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यरोबोअमचा पुत्र नादाब इस्राएलचा राजा झाला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले.

  13. त्याच्या राज्याच्या सुरुवातीलाच, त्याने यरोबोअमच्या संपूर्ण घराण्याला मारून टाकले, याहवेहचा सेवक शिलोनी अहीयाहच्या वचनानुसार त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही, सर्वांचा नाश केला.

  14. जी पापे यरोबोअमने केली आणि इस्राएली लोकांना देखील करावयाला लावली आणि त्याने याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा राग भडकाविला म्हणून हे सगळे घडले.

  15. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. त्याने यरोबोअमच्या मार्गाचे अनुसरण करून जी पापे त्याने इस्राएलास करण्यास लावले, तीच पापे बाशानेही केली.

  16. “मी तुला धुळीतून उचलून माझ्या इस्राएली लोकांवर अधिकारी नेमले, परंतु तू यरोबोअमचा मार्ग अनुसरला आहेस व माझ्या इस्राएली लोकांना पाप करावयाला भाग पाडले आणि त्यांच्या पापामुळे माझा क्रोध भडकविला आहे.

  17. म्हणून मी बाशा व त्याच्या घराण्याला नाहीसे करेन आणि मी तुझ्या घराण्याला नेबाटाचा पुत्र यरोबोअम याच्या घराण्यासारखे करेन.

  18. त्याचप्रमाणे, हनानीचा पुत्र येहू संदेष्ट्याच्या द्वारे याहवेहचे जे वचन बाशा व त्याच्या घराण्याकडे आले, कारण त्याने याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले व त्याने केलेल्या कृत्यांमुळे याहवेहचा क्रोध भडकविला, त्यामुळे यरोबोअमच्या घराण्यासारखे त्याचे झाले; आणि त्याचा नाश झाला.

  19. कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करून त्याने पाप केले आणि यरोबोअमचे अनुसरण करीत त्याने जी पापे केली, ती केली व इस्राएली लोकांना सुद्धा ती पापे करावयाला भाग पाडले.

  20. त्याने पूर्णपणे नेबाटाचा पुत्र यरोबोअमचे अनुसरण केले होते, यरोबोअमने इस्राएली लोकांना जी पापे करावयाला भाग पाडले, ती त्याने केली आणि त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.

  21. नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पापांना क्षुल्लक समजून त्याचे अनुसरण केले; इतकेच नाही, तर त्याने सीदोनी राजा एथबालची कन्या ईजबेल हिच्याशी विवाह केला आणि बआलची सेवा व उपासना करू लागला.

  22. मी तुझ्या कुटुंबाचे नेबाटाचा पुत्र यरोबोअम व अहीयाहचा पुत्र बाशा यांच्याप्रमाणे करेन, कारण तू माझा क्रोध भडकविला आहेस आणि इस्राएलास पाप करण्यास भाग पाडले आहे.’

  23. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण त्याने ज्यांनी इस्राएलास पाप करावयाला भाग पाडले असा आपला पिता, आई व नेबाटाचा पुत्र यरोबोअम त्यांचे अनुसरण केले.

  24. तरीपण, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएली लोकांना जे पाप करावयाला लावले, त्या पापास तो चिकटून राहिला; त्याने ती पापे सोडली नाही.

  25. नेबाटाचा पुत्र यरोबोअम आणि अहीयाहचा पुत्र बाशा यांच्या घराण्यासारखे मी अहाबाच्या घराण्याचे करेन.