मुख्य मजकुरावर जा

Jeroboam

81 वचने · 4 कुटुंब सदस्य

Jeroboam चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तरी देखील नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेली पातके यापासून येहू फिरला नाही—त्याने बेथेल व दान येथील वासरांच्या सोन्याच्या मूर्तीची उपासना केली.

  2. परंतु येहू याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे नियम आपल्या पूर्ण अंतःकरणाने पाळण्यात काळजीपूर्वक राहिला नाही. यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेल्या पातकांपासून तो मागे फिरला नाही.

  3. पण त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलांकडून जी पातके करविली ती त्याने अनुसरली आणि त्यापासून तो मागे फिरला नाही.

  4. परंतु ते यरोबोअमाच्या घराण्याने इस्राएली लोकांना जी पातके करण्यास लावली होती, त्या पातकांपासून मागे फिरले नाहीत. शोमरोनात अशेरा मूर्तीचे स्तंभ देखील उभे होते.

  5. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले आणि नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पातकांपासून मागे फिरला नाही; जी पातके त्याने इस्राएली लोकांना करण्यास लावली होती, ती तो करत राहिला.

  6. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.

  7. आपल्या पूर्वजांप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.

  8. याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली, त्या पातकांपासून तो मागे फिरला नाही.

  9. पेकाहियाहने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली होती, तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.

  10. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.

  11. जेव्हा याहवेहने इस्राएल दावीदाच्या घराण्यापासून फाडून काढला, तेव्हा इस्राएली लोकांनी नेबाटाचा पुत्र यराेबाेअमास आपला राजा केले. तेव्हा यरोबोअमाने इस्राएली लोकांना याहवेहच्या मागे जाण्यापासून बहकविले आणि त्यांना फार मोठे पाप करण्यास लावले.

  12. इस्राएली लोक यरोबोअमच्या सर्व पापांमध्ये टिकून राहिले आणि त्यांच्यापासून फिरले नाही,

  13. बेथेल येथे उभारलेली वेदी, टेकड्यांवरील मंदिरे, नेबाटाचा पुत्र यरोबोअमद्वारे तयार करण्यात आलेली वेदी, ज्याद्वारे इस्राएली लोकांनी पाप केले होते ती आणि टेकड्यांवरील मंदिरे पाडून टाकली. त्याने त्या मंदिराचे धोंडे जमीनदोस्त करून त्याचा भुगा केला आणि अशेराची ओंगळ मूर्ती जाळून भस्म केली.

  14. शलोमोनच्या राज्यकाळातील इतर घटनांबद्दल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ते नाथान संदेष्ट्याच्या नोंदीमध्ये, शिलोनी अहीयाहच्या भविष्यवाणीमध्ये आणि नेबाटाचा पुत्र यरोबोअमविषयी इद्दो संदेष्ट्याच्या दृष्टान्तात लिहिलेल्या नाहीत का?

  15. जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो अजूनही इजिप्त देशातच होता तिथे तो शलोमोन राजापासून पळून गेला होता), तो इजिप्तवरून परत आला होता.

  16. तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि संपूर्ण इस्राएल रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले:

  17. तीन दिवसानंतर यरोबोअम व सर्व लोक रेहोबोअमकडे आले, कारण राजाने त्यांना सांगितले होते, “तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.”

  18. अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे परमेश्वराने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या.

  19. ‘याहवेह असे म्हणतात: इस्राएली जे तुमचे बांधव आहेत, त्यांच्याविरुद्ध युद्ध करू नका. तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी जा, कारण हे मी सांगत आहे.’ ” म्हणून त्यांनी याहवेहचा शब्द मानला आणि आणि यरोबोअमच्या विरुद्ध युद्ध करण्यापासून माघार घेतली.

  20. लेवीय लोकांनी त्यांची कुरणे आणि मालमत्तासुद्धा सोडली आणि ते यहूदीया आणि यरुशलेमेत आले, कारण यरोबोअम आणि त्याच्या मुलांनी त्यांना याहवेहचे याजक म्हणून नाकारले होते,

  21. रेहोबोअमच्या कारकिर्दीतील घटनांबद्दल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, शमायाह संदेष्टा आणि इद्दो द्रष्टा यांनी तयार केलेल्या वंशावळीत त्या लिहिलेल्या नाहीत काय? रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले.

  22. इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाह यहूदीयाचा राजा झाला.

  23. त्याने यरुशलेमात तीन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव माकाह होते. ती गिबियाह येथील उरीएल याची कन्या होती. अबीयाह व यरोबोअम यांच्यामध्ये युद्ध झाले.

  24. अबीयाहने चार लाख सक्षम योद्धे घेतले, यरोबोअम आठ लाख संख्या असलेले सक्षम सैन्य घेऊन त्याच्या विरोधात युद्धरेषेवर जाऊन थांबला.

  25. अबीयाह एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील सेमाराईम पर्वतावर उभा राहिला आणि म्हणाला, “यरोबोअम आणि सर्व इस्राएल लोकांनो, माझे ऐका!