Skip to content

Syria

64 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Syrians

33.5100, 36.3100 गूगल नकाशावर पाहा

Syria चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. ते बआल व अष्टारोथ या दैवतांच्या मूर्तीची आणि अरामाचे दैवत, सीदोनाचे दैवत, मोआबाचे दैवत, अम्मोनाचे दैवत व पलिष्टीच्या दैवतांची उपासना व सेवा करू लागले. इस्राएली लोक याहवेहला विसरले आणि त्यांची सेवा करणे सोडले.

  2. त्यांनी सहाशे शेकेल चांदी देऊन इजिप्तवरून रथ आयात करून आणले व एकेका घोड्याची किंमत एकशे पन्नास शेकेल चांदी इतकी होती. हिथी व अरामी राजांना सुद्धा ते पाठवित असत.

  3. शलोमोन जिवंत होता तोपर्यंत हदादने दिलेल्या त्रासात भर असे रेजोनने देखील इस्राएलशी वैर केले. तेव्हा रेजोनने अरामात राज्य केले व इस्राएलला विरोध केला.

  4. त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील भांडारात उरलेले सर्व चांदी व सोने काढून घेतले व ते आपल्या सरदारांच्या हाती स्वाधीन करून त्यांना हेजीओनचा पुत्र ताब्रिम्मनचा पुत्र बेन-हदाद, अरामचा राजा जो दिमिष्कात राज्य करीत होता त्याच्याकडे पाठवले.

  5. याहवेहने त्याला म्हटले, “तू आलास त्या मार्गाने परत दिमिष्काच्या वाळवंटाकडे जा. आणि तिथे जाशील तेव्हा हजाएलचा अरामचा राजा म्हणून अभिषेक कर.

  6. अरामचा राजा बेन-हदादाने आपले सैन्य एकत्र केले. त्याच्याबरोबर बत्तीस राजे आपआपले घोडे व रथ घेऊन त्यांनी शोमरोनला वेढा घालून त्यावर हल्ला केला.

  7. आणि त्या प्रत्येकाने आपआपल्या विरोधकांना मारून टाकले; आणि अरामी लोकांनी पळ काढला आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पाठलाग केला. पण अरामचा राजा बेन-हदाद आपल्या काही घोडेस्वारांबरोबर घोड्यावर स्वार होऊन निसटून गेला.

  8. त्यानंतर, संदेष्ट्याने इस्राएलच्या राजाकडे येऊन म्हटले, “आपणास बळकट करा आणि काय करावे हे जपून पाहा, कारण पुढील वसंतऋतूमध्ये अरामचा राजा पुन्हा तुझ्यावर हल्ला करेल.”

  9. त्या दरम्यान, अरामाच्या राजाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला, “त्यांची दैवते, डोंगरावरील दैवते आहेत. म्हणून ते आपल्यासमोर अधिक प्रबळ ठरले. परंतु आपण त्यांच्याशी जर मैदानावर लढलो, तर आपण त्यांच्यावर प्रबळ ठरू.

  10. जेव्हा इस्राएली लोकसुद्धा एकत्र होऊन आपला अन्नसामुग्रींचा पुरवठा करून त्यांचा सामना करण्यास निघाले. इस्राएली लोकांनी शेळ्यांच्या दोन लहान कळपांप्रमाणे त्यांच्यासमोर तळ दिला आणि अरामी लोकांनी सर्व प्रदेशाला व्यापून टाकले होते.

  11. सात दिवसापर्यंत त्यांनी एकमेकांसमोर तळ दिला आणि सातव्या दिवशी लढाई सुरू झाली. इस्राएली लोकांनी एका दिवसात एक लाख अरामी पायदळी सैन्याला मारून टाकले.

  12. पुढील तीन वर्षात अराम व इस्राएलमध्ये युद्ध झाले नाही.

  13. इस्राएलचा राजा आपल्या अधिकार्‍यांना म्हणाला, “रामोथ गिलआद आपलेच आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय आणि तरीही अरामाच्या राजाकडून ते परत घेण्यास आपण काहीही का करत नाही?”

  14. आता अरामाच्या राजाने आपल्या बत्तीस रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.”

  15. नामान हा अरामाच्या राजाच्या सैन्याचा सेनापती होता. तो त्याच्या स्वामीच्या नजरेत एक थोर आणि अत्यंत आदरणीय होता, कारण याहवेहने त्याच्याद्वारे अरामाला विजय मिळवून दिला होता. तो एक पराक्रमी वीरपुरुष होता; परंतु त्याला कुष्ठरोग झाला होता.

  16. तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “मग आता जा आणि मी इस्राएलाच्या राजाला पत्र पाठवितो.” मग नामान आपल्याबरोबर चांदीचे दहा तालांत, सोन्याची सहा हजार सोन्याची नाणी आणि उंची पोशाखांचे दहा जोड घेऊन निघाला.

  17. त्यावेळी अरामाच्या राजाने इस्राएलशी युद्ध केले असता, आपल्या अधिकार्‍यांशी मसलत केली आणि तो म्हणाला, “मी अमुक ठिकाणी माझा तळ देणार आहे.”

  18. तेव्हा अरामचा राजा संतप्त झाला. त्याने आपल्या अधिकार्‍यांना बोलाविले आणि मागणी केली, “आपल्यापैकी कोण इस्राएलाच्या राजाच्या बाजूने आहे?”

  19. काही काळानंतर अरामचा बेन-हदाद राजाने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव करून शोमरोनावर स्वारी केली आणि त्याला वेढा दिला.

  20. अलीशा दिमिष्क येथे गेला आणि अरामचा राजा बेन-हदाद आजारी होता. जेव्हा राजाला सांगण्यात आले, “परमेश्वराचा मनुष्य येथे वर आलेला आहे,”

  21. हजाएल त्याच्यासोबत दिमिष्कच्या सर्व उत्तम भेटवस्तू चाळीस उंटावर लादून अलीशाला भेटण्यासाठी गेला. तो गेला आणि त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हटले, “तुमचा पुत्र, अरामचा राजा बेन-हदाद, यांनी मला आपल्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, मी या आजारातून बरा होईन की नाही?”

  22. हजाएल म्हणाला, “तुमचा सेवक मी एक कुत्रा आहे, एवढी मोठी गोष्ट कशी करणार?” अलीशाने उत्तर दिले, “याहवेहने मला दाखविले आहे, तू अरामचा राजा होणार,”

  23. अरामचा राजा, हजाएलविरुद्ध रामोथ गिलआद येथे झालेल्या युद्धात अहज्याह इस्राएलचा राजा अहाबाचा पुत्र योरामच्या बाजूने लढला. या युद्धात योराम राजा जखमी झाला;

  24. रामाह येथे अरामचा राजा हजाएलशी लढताना झालेल्या जखमांना मलम पट्टी करण्यासाठी योराम राजा येज्रीलला परतला. यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याह हा अहाबाचा पुत्र योरामची प्रकृती पाहण्यासाठी येज्रीलला गेला, कारण योराम जखमी झाला होता.

  25. निमशीचा पुत्र यहोशाफाटचा पुत्र येहूने योराम राजाविरुद्ध बंड पुकारले. (त्यावेळेस योराम राजा सर्व सैन्यानिशी रामोथ गिलआद येथे अरामचा राजा हजाएलविरुद्ध इस्राएलांच्या बाजूने लढत होता.