मुख्य मजकुरावर जा

Syria

64 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Syrians

33.5100, 36.3100 गूगल नकाशावर पाहा

Syria चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण यहोराम राजा हा अरामचा राजा हजाएलशी लढताना ज्या जखमा अरामी लोकांनी दिल्या होत्या, त्या जखमा बर्‍या व्हाव्यात म्हणून तो येज्रीलला परतला होता.) येहू म्हणाला, “मी राजा व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर आपण काय केले आहे हे कोणीही या नगरीतून निसटून ही बातमी येज्रीलमध्ये कोणालाही कळवू नये म्हणून खबरदारी घ्या.”

  2. या वेळेला अरामचा राजा हजाएलाने गथ शहरावर स्वारी केली आणि ते काबीज केले. मग यरुशलेमावर स्वारी करण्यासाठी त्याने कूच केले.

  3. तेव्हा यहूदीयाचा राजा यहोआशने आपले पूर्वज म्हणजे—यहोशाफाट, यहोराम, अहज्याह या यहूदीयाच्या राजांनी—आणि त्याने स्वतः समर्पित केलेल्या भेटवस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व सोने त्याने अरामचा राजा हजाएलकडे पाठवून दिले. मग तो यरुशलेममधून निघून गेला.

  4. त्याच्या पातकांमुळे याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि त्यांनी त्याला अरामचा राजा हजाएल आणि त्याचा पुत्र बेन-हदादच्या अधीनतेमध्ये बराच काळ ठेवले.

  5. तेव्हा यहोआहाजाने याहवेहकडे विनवणी केली आणि याहवेहने त्याचे ऐकले, कारण अरामचा राजा इस्राएलाचा अत्यंत क्रूरपणे छळ करीत होता हे त्यांनी पाहिले.

  6. यहोआहाजाकडे पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजार पायदळ याशिवाय काही शिल्लक राहिले नाही, कारण अरामी राजाने त्याच्या बाकीच्या सैन्याचा पायांखालील धुळीच्या कणांप्रमाणे संहार केला होता.

  7. “पूर्वेकडील खिडकी उघड.” असे अलीशाने म्हटले आणि त्याने ती उघडली. तेव्हा अलीशा म्हणाला, “बाण सोड!” आणि त्याने बाण सोडला. तेव्हा अलीशाने जाहीर केले, “हा याहवेहचा विजयी बाण, अरामावर विजय मिळवून देणारा बाण आहे. तू अफेक येथे अरामी लोकांचा संपूर्ण नाश करशील.”

  8. परमेश्वराचा मनुष्य त्याच्यावर रागावला आणि म्हणाला, “तू पाच किंवा सहा बाण जमिनीवर सोडावयास हवे होतेस; तेव्हा तू अरामचा पराभव आणि पूर्ण नाश केला असतास. परंतु आता तू फक्त तीन वेळाच त्यांचा पराभव करशील.”

  9. यहोआहाज राजाच्या संपूर्ण कारकिर्दीत अरामचा राजा हजाएल इस्राएली लोकांचा छळ करीत राहिला.

  10. अरामचा राजा हजाएल मरण पावला आणि त्याचा पुत्र बेन-हदाद त्याच्या जागी राज्य करू लागला.

  11. (त्या दिवसात याहवेहने अरामचा राजा रसीन आणि रमाल्याहचा पुत्र पेकह यांना यहूदीयावर स्वारी करण्यास उद्युक्त केले.)

  12. मग अरामचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकह यांनी यरुशलेमवर हल्ला केला आणि आहाजाला वेढा दिला, परंतु ते त्याच्यावर विजय प्राप्त करू शकले नाहीत.

  13. त्यावेळी अरामचा राजा रसीनने एलाथ हे शहर जिंकून घेतले आणि त्याने यहूद्यांना हुसकावून लावले. ते अरामात सामील केले. त्या शहरातून व एदोमी लोकांनी येऊन एलाथ येथे वस्ती केली आणि आजही अरामी लोक तिथे राहत आहेत.

  14. आहाज राजाने अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसरकडे आपले दूत पाठवून त्याला संदेश दिला, “मी तुमचा दास आणि पुत्र आहे. वर येऊन अरामी राजा आणि इस्राएली राजा यांच्यापासून माझा बचाव करा, ज्यांनी माझ्यावर आक्रमण केले आहे.”

  15. त्यांनी सहाशे शेकेल चांदी देऊन इजिप्तवरून रथ आयात करून आणले व एकेका घोड्याची किंमत एकशे पन्नास शेकेल चांदी इतकी होती. हिथी व अरामी राजांना सुद्धा ते निर्यात करीत असे.

  16. त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील खजिन्यातून चांदी व सोने काढून घेतले व ते दिमिष्कात राज्य करणारा बेन-हदाद अरामच्या राजाकडे पाठवले.

  17. त्याचवेळेस हनानी हा संदेष्टा यहूदीयाचा राजा आसा याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “तुम्ही अरामच्या राजावर भरवसा ठेवला आणि तुमचे परमेश्वर याहवेह यांच्यावर ठेवला नाही, या कारणाने अरामच्या राजाचे सैन्य तुमच्या हातून निसटले आहे.

  18. आता अरामाच्या राजाने आपल्या रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.”

  19. त्याने त्यांच्या सल्ल्याप्रमाणेसुद्धा केले जेव्हा तो अरामचा राजा हजाएलविरुद्ध रामोथ गिलआद येथे झालेल्या युद्धात अहज्याह इस्राएलचा राजा अहाबाचा पुत्र यहोराम च्या बाजूने लढला. या युद्धात योराम राजा जखमी झाला;

  20. रामाह येथे अरामचा राजा हजाएलशी लढताना झालेल्या जखमांना मलम पट्टी करण्यासाठी योराम राजा येज्रीलला परतला. यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याह अहाबाचा पुत्र योरामची प्रकृती पाहण्यासाठी येज्रीलला गेला, कारण योराम जखमी झाला होता.

  21. त्यामुळेच त्याचे परमेश्वर याहवेहनी त्याला अरामच्या राजाच्या हाती सोपविले. अरामी लोकांनी त्याचा पराभव केला आणि त्याच्या अनेक लोकांना कैद करून दिमिष्क येथे आणले. त्याला इस्राएलच्या राजाच्या हातीही सोपविले, ज्याने त्याला भारी हानी पोहोचविली.

  22. त्याने दिमिष्कच्या दैवतांना बलिदान केले, ज्यांनी त्याचा पराभव केला होता; कारण त्याला वाटले, “अरामच्या राजांच्या दैवतांनी त्यांना मदत केली म्हणून मी त्यांना बलिदान करेन म्हणजे ते मला मदत करतील.” परंतु तेच त्याचे आणि सर्व इस्राएलचे पतन होण्याचे कारण होते.

  23. जेव्हा यहूदीयाचा राजा आहाज, जो योथामचा पुत्र, जो उज्जीयाहचा पुत्र होता, अरामचा राजा रसीन आणि इस्राएलचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकहने यरुशलेमवर हल्ला केला, परंतु त्यांच्यावर ते विजय मिळवू शकले नाहीत.

  24. आता दावीदाच्या वंशजांना असे सांगण्यात आले, “अरामने एफ्राईमशी युती केली आहे;” तेव्हा जंगलातील झाडे जशी वाऱ्याने हादरली जातात तशीच आहाज आणि त्याच्या लोकांची मने हादरली.

  25. आहाजाला सांग, ‘सावध राहा, शांत राहा आणि घाबरू नकोस. जळाऊ लाकडाच्या या दोन धुरकट थोटकामुळे अंतःकरण खचून देऊ नको—रसीन आणि अराम आणि रमाल्याहच्या पुत्राच्या भयंकर रागामुळे अंतःकरण खचू देऊ नको.