Skip to content

Ben-Hadad बद्दल बायबलमधील वचने

17 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील भांडारात उरलेले सर्व चांदी व सोने काढून घेतले व ते आपल्या सरदारांच्या हाती स्वाधीन करून त्यांना हेजीओनचा पुत्र ताब्रिम्मनचा पुत्र बेन-हदाद, अरामचा राजा जो दिमिष्कात राज्य करीत होता त्याच्याकडे पाठवले.

  2. आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोन्याची भेट पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.”

  3. बेन-हदद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठविले. त्याने इय्योन, दान, आबेल-बेथ-माकाह आणि नफतालीसहीत संपूर्ण किन्नेरेथवर विजय मिळविला.

  4. अलीशा दिमिष्क येथे गेला आणि अरामचा राजा बेन-हदाद आजारी होता. जेव्हा राजाला सांगण्यात आले, “परमेश्वराचा मनुष्य येथे वर आलेला आहे,”

  5. राजाने हजाएलला म्हटले, “एखादी भेट घेऊन परमेश्वराच्या मनुष्याला भेटण्यास जा आणि त्याच्याद्वारे याहवेहस विचार, ‘मी या आजारातून बरा होईन की नाही?’ ”

  6. हजाएल त्याच्यासोबत दिमिष्कच्या सर्व उत्तम भेटवस्तू चाळीस उंटावर लादून अलीशाला भेटण्यासाठी गेला. तो गेला आणि त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हटले, “तुमचा पुत्र, अरामचा राजा बेन-हदाद, यांनी मला आपल्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, मी या आजारातून बरा होईन की नाही?”

  7. अलीशाने उत्तर दिले, “जा आणि त्याला सांग, ‘तू नक्कीच बरा होशील.’ परंतु याहवेहने मला स्पष्ट दाखविले आहे की तो अवश्य मरेल.”

  8. यानंतर अलीशाने हजाएलकडे तो इतका लाजिरवाणा होईपर्यंत रोखून पाहिले की हजाएल भांबावून गेला. त्यानंतर परमेश्वराचा मनुष्य रडू लागला.

  9. हजाएलाने विचारले, “माझे स्वामी का रडत आहेत?” अलीशाने उत्तर दिले, “कारण मला माहीत आहे की तू इस्राएली लोकांचे वाईट करणार आहेस, तू त्यांच्या तटबंदीच्या ठिकाणास आग लावशील, त्यांच्या तरुण पुरुषांना तलवारीने ठार मारशील, त्यांच्या बालकांना आपटून मारशील आणि गर्भवती स्त्रियांना चिरून टाकशील.”

  10. हजाएल म्हणाला, “तुमचा सेवक मी एक कुत्रा आहे, एवढी मोठी गोष्ट कशी करणार?” अलीशाने उत्तर दिले, “याहवेहने मला दाखविले आहे, तू अरामचा राजा होणार,”

  11. त्यानंतर हजाएल अलीशाला सोडून गेला आणि आपल्या स्वामीकडे परत आला. जेव्हा बेन-हदादने विचारले, “अलीशाने तुला काय सांगितले?” हजाएलाने उत्तर दिले, “त्यांनी मला सांगितले की तुम्ही नक्कीच बरे होणार.”

  12. परंतु दुसर्‍या दिवशी त्याने एक रजई पाण्यात भिजविली आणि ती राजाच्या तोंडावर पसरली, त्यामुळे राजा मरण पावला. त्यानंतर हजाएल त्याच्या ठिकाणी राजा झाला.

  13. अरामचा राजा हजाएल मरण पावला आणि त्याचा पुत्र बेन-हदाद त्याच्या जागी राज्य करू लागला.

  14. मग यहोआहाजचा पुत्र यहोआशने हजाएलचा पुत्र बेन-हदादच्या हातून त्याचा पिता यहोआहाजशी केलेल्या युद्धात घेतलेली नगरे परत हस्तगत केली. योआशाने त्याचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलाची नगरे परत घेतली.

  15. त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील खजिन्यातून चांदी व सोने काढून घेतले व ते दिमिष्कात राज्य करणारा बेन-हदाद अरामच्या राजाकडे पाठवले.

  16. आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोने पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.”

  17. बेन-हदाद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठवले. त्यांनी इय्योन, दान, आबेल-माईम आणि नफतालीचे सर्व भांडारशहरे ही जिंकून घेतली.