Skip to content

Elisha

53 वचने · 1 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Eliseus

Elisha चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि निमशीचा पुत्र येहूचा सुद्धा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर व आबेल-महोलाह येथील शाफाटचा पुत्र अलीशाचा तुझा वारस म्हणून संदेष्टा होण्यास अभिषेक कर.

  2. हजाएलच्या तलवारीपासून जो कोणी निसटेल त्याला येहू मारून टाकेल आणि जे येहूच्या तलवारीपासून निसटतील त्यांना अलीशा जिवे मारेल.

  3. म्हणून एलीयाह तिथून निघाला आणि त्याला शाफाटचा पुत्र अलीशा दिसला. नांगराला बारा बैल जुंपून तो नांगरणी करीत होता आणि तो स्वतः बाराव्या बैलाच्या जोडीवर होता. एलीयाह त्याच्याकडे गेला व आपला झगा त्याच्यावर टाकला.

  4. जेव्हा याहवेहने एलीयाहला वावटळीद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. तेव्हा एलीयाह आणि अलीशा गिलगालहून निघाले होते.

  5. एलीयाहने अलीशाला म्हटले, “इथे थांब; याहवेहने मला बेथेलला पाठवले आहे.” परंतु अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ आणि तुमच्या जीविताची शपथ मी आपणास सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे खाली बेथेलला गेले.

  6. तिथे बेथेलातील संदेष्ट्यांचा एक समूह अलीशाकडे आला आणि विचारले, “आज याहवेह तुझ्या स्वामीला तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” अलीशाने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.”

  7. नंतर एलीयाह त्याला म्हणाला, “अलीशा तू येथेच राहा; कारण याहवेह मला यरीहोस पाठवित आहे.” आणि त्याने म्हटले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघेही यरीहोला गेले.

  8. तिथे यरीहोच्या संदेष्ट्यांचा एक समूह अलीशास म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला याहवेह तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.”

  9. ते पार गेल्यावर एलीयाह अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून घेतले जाण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करावे ते मला सांग?” “अलीशाने उत्तर दिले, तुमच्यामध्ये असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”

  10. अलीशाने हे पाहिले आणि आरोळी मारली, “हे माझ्या पित्या! माझ्या पित्या! अहो इस्राएलांच्या रथांनो आणि इस्राएलांच्या सारथ्यांनो!” आणि अलीशा त्याला पुन्हा पाहू शकला नाही. तेव्हा अलीशाने आपला झगा फाडला आणि त्याचे दोन तुकडे केले.

  11. त्याने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा घेतला आणि पाण्यावर मारला. “एलीयाहचा याहवेह परमेश्वर कुठे आहेत?” जेव्हा त्याने झग्याने पाण्यावर मारले तेव्हा पाणी हे उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि अलीशा पैलतीरावर गेला.

  12. यरीहोतील संदेष्ट्यांचा एक समूह, जो हे पाहत होता म्हणाला, “एलीयाहचा आत्मा अलीशावर उतरला आहे.” ते त्याला भेटण्यास गेले आणि भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले.

  13. नगरातील लोक अलीशाला म्हणाले, “आमच्या प्रभू, जसे तुम्ही पाहत आहात, नगर उत्तम वसलेले आहे, परंतु पाणी वाईट आहे आणि भूमी नापीक आहे.”

  14. आणि अलीशाने म्हटल्याप्रमाणे ते पाणी शुद्ध झाले आणि आजवरही तसेच आहे.

  15. परंतु यहोशाफाटने विचारले, “याहवेहचा एखादा संदेष्टा इथे नाही काय, म्हणजे आपण याहवेहला विचारू शकू?” तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या अधिकार्‍याने उत्तर दिले, “शाफाटाचा पुत्र अलीशा इथे आहे. जो एलीयाहच्या हातावर पाणी घालत असे.”

  16. अलीशाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “तुम्ही माझ्याकडे का आला? तुम्ही तुमच्या वडिलांच्या संदेष्ट्याकडे जा आणि तुमच्या आईच्या संदेष्ट्याकडे जा.” तेव्हा इस्राएलाच्या राजाने उत्तर दिले, “नाही! कारण याहवेहनेच आमचा पराभव मोआबाच्या राजाच्या हातून व्हावा म्हणून आम्हा तीन राजांना इकडे आणले आहे.”

  17. अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्यांच्या सान्निध्यात मी उभा राहतो, जर मला यहूदीयाचा राजा यहोशाफाट याच्याबद्दल आदर नसता तर मी तुमच्याकडे लक्ष दिले नसते.

  18. संदेष्ट्यांच्या समुहातील एका मनुष्याची पत्नी रडून अलीशाला म्हणाली, “तुमचा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुम्हाला माहीत आहे तो याहवेहचे भय बाळगणारा होता. पण आता त्याचा सावकार माझ्या दोन मुलांना त्याचे गुलाम व्हावे म्हणून घ्यायला येत आहे.”

  19. अलीशाने तिला विचारले, “मी तुला कशी मदत करू शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग?” ती म्हणाली, “एका कुपीत थोड्याशा जैतुनाच्या तेलाशिवाय तुमच्या दासीजवळ काहीही नाही.”

  20. एके दिवशी अलीशा शूनेम येथे गेला आणि तिथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती, तिने त्याला भोजनासाठी आग्रह केला. जेव्हा तो त्या मार्गाने जाई, तेव्हा तेव्हा तो तिच्या घरी भोजनासाठी उतरत असे.

  21. पण अलीशाने तिला सांगितल्याप्रमाणे ती स्त्री गर्भवती झाली आणि पुढच्या वर्षी वसंतॠतूत तिने एका पुत्राला जन्म दिला.

  22. अलीशा घरात गेला, तो त्याला मुलगा मृत होऊन त्याच्या खाटेवर पडला आहे असे दिसले,

  23. अलीशा गिलगाल येथे परत आला आणि त्या भागात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचा समूह त्याच्यापुढे बसलेला होता, त्याने आपल्या सेवकास म्हटले, “चुलीवर मोठे भांडे ठेऊन या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.”

  24. इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली आहेत, असे जेव्हा परमेश्वरचा मनुष्य अलीशाने ऐकले, तेव्हा त्याने राजाला हा निरोप पाठविला: “तुम्ही आपली वस्त्रे का फाडली? त्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवून द्या आणि त्याला समजून येईल की इस्राएलमध्ये संदेष्टा आहे.”

  25. तेव्हा नामानाने आपले घोडे आणि रथ घेतले आणि अलीशाच्या दारात येऊन उभा राहिला.