Hanani
Hanani चा उल्लेख असलेली वचने
हनानीचा पुत्र येहूकडे बाशासंबंधी याहवेहचे जे वचन आले ते हे:
त्याचप्रमाणे, हनानीचा पुत्र येहू संदेष्ट्याच्या द्वारे याहवेहचे जे वचन बाशा व त्याच्या घराण्याकडे आले, कारण त्याने याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले व त्याने केलेल्या कृत्यांमुळे याहवेहचा क्रोध भडकविला, त्यामुळे यरोबोअमच्या घराण्यासारखे त्याचे झाले; आणि त्याचा नाश झाला.
त्याचवेळेस हनानी हा संदेष्टा यहूदीयाचा राजा आसा याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “तुम्ही अरामच्या राजावर भरवसा ठेवला आणि तुमचे परमेश्वर याहवेह यांच्यावर ठेवला नाही, या कारणाने अरामच्या राजाचे सैन्य तुमच्या हातून निसटले आहे.
तेव्हा हनानीचा पुत्र येहू संदेष्टा त्याला भेटण्यासाठी गेला आणि यहोशाफाट राजाला म्हणाला, “तुम्ही दुष्टाला मदत करावी आणि जे याहवेहचा द्वेष करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम करावे काय? याच कारणामुळे याहवेहचा क्रोध तुमच्यावर आहे.
यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या घटना हनानीचा पुत्र येहू याच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत, ज्याची नोंद इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात आहेत.