मुख्य मजकुरावर जा

Jehu

5 वचने · 1 कुटुंब सदस्य

Jehu चा उल्लेख असलेली वचने

  1. हनानीचा पुत्र येहूकडे बाशासंबंधी याहवेहचे जे वचन आले ते हे:

  2. त्याचप्रमाणे, हनानीचा पुत्र येहू संदेष्ट्याच्या द्वारे याहवेहचे जे वचन बाशा व त्याच्या घराण्याकडे आले, कारण त्याने याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले व त्याने केलेल्या कृत्यांमुळे याहवेहचा क्रोध भडकविला, त्यामुळे यरोबोअमच्या घराण्यासारखे त्याचे झाले; आणि त्याचा नाश झाला.

  3. याप्रकारे बाशाविरुद्ध याहवेहचे जे वचन येहू संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले गेले होते त्यानुसार, जिम्रीने बाशाच्या संपूर्ण घराण्याचा नाश केला;

  4. तेव्हा हनानीचा पुत्र येहू संदेष्टा त्याला भेटण्यासाठी गेला आणि यहोशाफाट राजाला म्हणाला, “तुम्ही दुष्टाला मदत करावी आणि जे याहवेहचा द्वेष करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम करावे काय? याच कारणामुळे याहवेहचा क्रोध तुमच्यावर आहे.

  5. यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या घटना हनानीचा पुत्र येहू याच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत, ज्याची नोंद इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात आहेत.